संघटना मजबूत करण्यासाठी अजित पवार सक्रीय; दिवाळीनंतर करणार राज्यव्यापी दौरा

राज्यातील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे दिवाळीनंतर राज्यव्यापी दौरा करणार असल्याची माहिती अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शनिवारी येथे दिली.

    संभाजीनगर : राज्यातील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे दिवाळीनंतर राज्यव्यापी दौरा करणार असल्याची माहिती अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शनिवारी दिली. यातून अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे बळकट संघटन उभे राहिल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध ३० आघाडीच्या प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना तटकरे यांनी अजित पवार यांच्या दौऱ्याची माहिती दिली. आगामी निवडणुका आणि राजकीय अवस्थेत घडामोडी यांसह अजितदादांच्या नेतृत्वाखाली घेतलेली भूमिका यावर बैठकीत चर्चा अशी करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    आमचे दौरे लवकरच सुरू होतील. संघटना मजबूत करण्यासाठी तालुकास्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत विविध सेलच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत. विशेष करून महिला आणि युवकांचे काम अत्यंत उत्तम पध्दतीने सुरू असल्याचे तटकरे म्हणाले.

    संजय राऊत यांच्या टीकेचा समाचार

    ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मनात काय सुरू आहे आणि ते कोणत्या मानसिक पोचले आहेत; तसेच, पुढची पाऊले कोणती उचलावी लागतील याबाबतची चर्चा संजय राऊत यांनी अजित पवार यांच्याशी केली होती. दादांना हात जोडून पुढे काय करायचे, विनंती ते करत होते. त्यामुळे अशा राऊतांना अजितदादांवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही, अशा शब्दांत तटकरे यांनी टीकेचा समाचार घेतला.