अजित पवार व एकनाथ शिंदे यांना एकही जागा मिळणार नाही; संजय राऊत यांचा दावा

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एकही जागा मिळणार नाही असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

    नाशिक : देशभरामध्ये सध्या लोकसभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत. तीन टप्प्यातील मतदान पार पडले असून उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यापूर्वी राज्यातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गट व अजित पवार गट यांच्यावर निशाणा साधला आहे. या दोन्ही गटांना लोकसभेची एकही जागा मिळणार नाही असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

    अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एकही जागा मिळणार नाही

    सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले, जी शिवसेना मोदी आणि शहा यांच्या मदतीने चोरली. त्याच्या मागे लोकांनी का उभे राहावे? एकनाथ शिंदेंकडे डॅमेज कॅट्रोल करायला काहीच शिल्लक नाही. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे व अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एकही जागा मिळणार नाही. त्यांनी पैशांच्या थैल्या वाटू द्या, खोटे गुन्हे टाकू द्या, मात्र लोक त्यांना मतदान करणार नाहीत. असा दावा संजय राऊत यांनी केला आहे

    मुख्यमंत्र्यांची अखेरची तडफड सुरु

    पुढे संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा सांधला. संजय राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी ही महाराष्ट्रामध्ये ठाण मांडले आहे. मात्र त्याचा काहीही परिणाम होणार नाही. या क्षणी परिस्थिती अशी आहे की राज्यात महाविकास आघाडी 35 जागा नक्कीच जिंकेल. तिन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मन लावून काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांची धावपळ सुरु आहे. मात्र ही त्यांची अखेरची तडफड सुरु आहे. असा टोला संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.