अजित पवार व खासदार सुळे बारामतीत आले एकत्र

    बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे शनिवारी सायंकाळी शारदोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले, त्यांनी आपल्या परिवारासह शारदोत्सव कार्यक्रमाचा आनंद लुटला.

    डेंग्यू आजारानंतर दिल्लीत अमित शहा यांची भेट घेण्यापूर्वी अजित पवार यांनी यांच्यासह सर्व कुटुंबातील व्यक्तींची भेट घेतली होती. त्यांच्या या कौटुंबिक स्नेह मेळाव्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू असतानाच अजित पवार केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेले होते. त्यांच्या या भेटीची चर्चा सर्वत्र सुरू होती. शनिवारी सायंकाळी दरवर्षीप्रमाणे पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शारदोत्सव या प्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन बारामती औद्योगिक वसाहत परिसरातील विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्रित उपस्थित राहून बेला शेंडे यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थित बारामतीकरांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. या कार्यक्रमास सुमित्रा पवार, दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपणास डेंग्यू झाल्याचे सांगत यावर्षीच्या दिवाळीमध्ये गर्दीपासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याने आपण आराम करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे पुन्हा चर्चेला उधान आले होते. त्यातच दोन दिवसांपूर्वी पुण्यातील प्रताप पवार यांच्या घरी पवार कुटुंबियांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य पवार कुटुंबीय उपस्थित होते. यानंतर अजित पवार यांची दिल्ली वारी विशेष चर्चेत राहिली. त्यानंतर शनिवारी अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे एकत्र आल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान पंधरा दिवसापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी आमचे कौटुंबिक संबंध वेगळे व राजकीय संबंध वेगळे असल्याचे सांगत यावर्षी नेहमीप्रमाणे पवार कुटुंबीय एकत्र दिवाळी साजरी करणार असल्याचे म्हटले होते.

    गोविंद बागेत सर्व पवार कुटुंबीय एकत्र
    दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी (दि १२) खासदार सुप्रिया सुळे,अजित पवार यांच्या पत्नी सूनेत्रा पवार, शर्मिला पवार, अजित पवार यांच्या भगिनी विजया पाटील, नीता पाटील या पवार कुटुंबातील प्रमुख महिला शरद पवार यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी एकत्र आल्या. यावेळी बारामती लोकसभा मतदार संघातील युवक योगेश याने सुतळी पासून बनविलेल्या चपलांची महिती सर्व जणी एकत्र घेत त्या पाहत असल्याचा फेसबुक लाईव्ह व्हिडिओ खा. सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.