Ajit Pawar on Sharad Pawar

माझे बंधू अखेरच्या काळात माझ्याकडे उपचार घेत होते. आता बोलणारे हे लोक एकदाही बघायला आले नव्हते, असं शरद पवार एका मुलाखतीत बोलले होते. त्यावरून अजित पवारांनी जोरदार प्रत्त्युतर देत शरद पवारांना सवाल विचारला आहे.

  Ajit Pawar on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. या फुटीमुळे त्यांच्यात कौटुंबिक कलही निर्माण झाला. या कौटुंबिक कलाहाचा परिणाम राज्याच्या राजकारणावरही होताना दिसतो. अजित पवार आणि शरद पवार एकमेकांवर खुल्या व्यासपीठांवरून खुलेआम टीकाही करतात. या टीका कधी राजकीय असतात तर कधी वैयक्तिक. आता अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांचा उल्लेख करून टीका केली आहे.
  अजित पवारांनीचे प्रत्युत्तर
  माझे बंधू अखेरच्या काळात माझ्याकडे उपचार घेत होते. आता बोलणारे हे लोक एकदाही बघायला आले नव्हते, असं शरद पवार एका मुलाखतीत बोलले होते. या टीकेवरून अजित पवारांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार म्हणाले, “माझे वडील वारले तेव्हा मी आणि माझा भाऊ लहान होतो. त्यामुळे ते त्यांच्याकडे उपचार करायला गेले असतील. १९७५ साली माझे वडील वारले. तेव्हा मी दहावीत वगैरे असेन. तुम्ही दहावीत असताना तुमच्या वडिलांना तुमचे काका घेऊन गेले असतील तर काकांवर तेवढा विश्वास पाहिजे ना. आपण गैरविश्वास दाखवू शकतो का?
  माझे वडील वारले तेव्हा मी आणि माझा भाऊ लहान
  माझे बंधू अखेरच्या काळात माझ्याकडे उपचार घेत होते. आता बोलणारे हे लोक एकदाही बघायला आले नव्हते, असं शर पवार एका मुलाखतीत बोलले होते. या टीकेवरून अजित पवारांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार म्हणाले, “माझे वडील वारले तेव्हा मी आणि माझा भाऊ लहान होतो. त्यामुळे ते त्यांच्याकडे उपचार करायला गेले असतील. १९७५ साली माझे वडील वारले. तेव्हा मी दहावीत वगैरे असेन. तुम्ही दहावीत असताना तुमच्या वडिलांना तुमचे काका घेऊन गेले असतील तर काकांवर तेवढा विश्वास पाहिजे ना. आपण गैरविश्वास दाखवू शकतो का?
  कोणता आजार त्यांना झाला होता
  “तिथे एकदा घरातील प्रमुख व्यक्तीने त्यांना नेलं आहे. मग त्यात १५ वर्षांच्या मुलाने लुडबूड करण्याची काय गरज? असा प्रश्न विचारत कोणत्या कामाकरता उपचार करायला बोलावलं होतं हे साहेबांनी सांगावं? असाही सवाल त्यांनी विचारला. तसंच, “कोणता आजार त्यांना झाला होता? कोणत्या आजाराकरता डॉक्टर किंवा कोणाकडून ट्रिटमेंट देत होतात हेही त्यांनी सांगावं, असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला.
  तर श्रीनिवास पवार माझ्याबरोबर असते
  २०१९ साली सकाळच्या शपथविधीला श्रीनिवास पवार तुमच्याबरोबर होते. पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते तुमच्याबरोबर नाहीत, असं का? असा प्रश्न विचारल्यावर अजित पवार म्हणाले, “मी उभा केलेल्या उमेदवाराऐवजी मी दुसरा उमेदवार उभा असता तर श्रीनिवास पवारांनी माझंच काम केलं असतं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी तुला साथ देणार आहे. पण ज्यावेळी उमेदवाराचं नाव कळालं तेव्हा ते म्हणाले की मी काम करणार नाही.”