cm eknath shinde

    अहमदनगर/शिर्डी : आज शिर्डीतील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी अजित पवारांचा दाखला देत, आमच्याकडे अजित पवार आले तरीही विरोधक आमचे सरकार पाडण्याचे भाषा करतात. तसेच हा कार्यक्रम सर्वसामान्यांसाठी असल्याचे शिंदे म्हणाले, हा राजकीय मेळावा नाही, असे त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.

    नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक

    एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक केले. शेतकरी, कष्टकरी यांचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना शिंदेंनी केली. मोदींमुळे देशाची अर्थव्यवस्था वाढली, असेही त्यांनी सांगितले.

    केंद्राचा राज्य सरकारला पाठिंबा

    केंद्राचा राज्य सरकारला पाठिंबा आहे. राज्याच्या सर्व मागण्या मान्य होतात. शिर्डीत जगभरातून साईभक्त येतात. समृद्धी महामार्गामुळे शिर्डीचा विकास होणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला दुप्पट भाव मिळाला पाहिजे म्हणून सरकारचे उपाय सुरू आहेत. दिवसा वीज देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे शिंदे म्हणाले.

    शासकीय हॉस्पिटलमध्ये पैसे भरायची गरज नाही

    कुठल्याही शासकीय हॉस्पिटलमध्ये आता एकही रुपया भरावा लागणार नाही. मोफत उपचार मिळणार आहेत. कुटुंबाच्या आजाराजी काळजी आता सरकार घेणार आहे. सर्व अटी-शर्ती आता काढून टाकल्या आहेत. ५ लाखांपर्यंत खर्च सरकार करणार आहे. महात्मा फुले योजनेअंतर्गत ही सेवा देण्यात येणार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.