…मग मुख्यमंत्री घरी बसणार का? अजित पवार यांची टीका

मंत्री नाही म्हणून राज्यातील काम थांबू नये, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांचे सर्व अधिकार सचिवांना दिलें आहेत. त्यामूळ सगळेच काम सचिव करत असतील तर, मुख्यमंत्री कशाला पाहिजे असा टोमना त्यांनी शिंदेना लगावला.

    पुणे : राज्यामध्ये एकनाथ शिंदे सरकार आल्यापासून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मंत्रिमंडळ विस्ताराला होणारा उशीर झाला आहे. त्यामुळे राज्यातील काम होत नाहीत अशी टीका होत असताना आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचे सर्व अधिकार सचिवांना द्यावे अशी मागणी देखील त्यांनी केली. राज्यात अशी वेळ आज पर्यंत मुख्यमंत्र्याची शपथ घेतल्यानंतर कुठल्याही मुख्यमंत्र्यावर आली नाही. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर ही वेळ आली हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे असेही अजित पवार म्हणाले.

    मंत्री नाही म्हणून राज्यातील काम थांबू नये, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांचे सर्व अधिकार सचिवांना दिलें आहेत. त्यामूळ सगळेच काम सचिव करत असतील तर, मुख्यमंत्री कशाला पाहिजे असा टोमना त्यांनी शिंदेना लगावला. मुख्यमंत्र्यांनी सगळे अधिकार मुख्य सचिवांना देऊन घरी बसावे अशी उपरोधीक टीका अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. राज्यात अनेक प्रश्न, समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी मंत्रीमंडळ असते. आता मंत्र्यांनीच सर्व अधिकार सचिवांना दिले आहेत त्यामुळे आमदारांची मंत्रीमंडळाची राज्यात गरज नाही असा चिमटा त्यांनी शिंदे-भाजप सरकारला काढला आहे.

    अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते. पक्षाच्या विविध कामासाठी तसेच पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका संदर्भात ते पुण्यात आले होते. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे-फडवणी सरकार यांवर टीका केली.