बारामतीमध्ये धुरळा! ननंद विरुद्ध भावजय लढत रंगणार; सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर

बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक गाजणार आहे. बारामतीसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

    बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक गाजणार आहे. बारामतीसाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बारामतीची निवडणूक ही ननंद आणि भावजयमध्ये होणार आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी घोषित केली.

    यंदाची लोकसभा निवडणूक जोरदार रंगणार आहे. सर्वांचे लक्ष बारामती मतदार संघाकडे लागले आहे. बारामतीमध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट यांची थेट लढत होणार आहे. पवार कुटुंबातील सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार हे दोन्ही उमेदवार एकमेकांसमोर कडे आव्हान उभे करणार आहेत. बारामती लोकसभेची निवडणूक ही दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.

    सध्या शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या विद्यमान खासदार आहेत. काही वेळापूर्वी शरद पवार गटाकडून त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर अगदी काही वेळातच सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. मागील अनेक महिन्यांपासून सुनेत्रा पवार यांच्या राजकीय एन्ट्रीची चर्चा रंगली होती. आता अजित पवार गटाक़डून अधिकृतपणे सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे बारामती लोकसभा निवडणूक जोरदार रंगणार असून ननंद विरुद्ध भावजय अशी लढत होणार आहे.