टीईटी घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी, सत्य समोर यावं – अजित पवार

टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नाव आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

    मुंबई : सध्या कालपासून राज्यात टीईटी घोटाळा (TET Scam) चर्चेत आहे. या घोटाळ्यात माजी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुंलींची नाव आल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. यावरुन राजकीय वर्तुळात अनेक जण आपली प्रतिक्रीया देताना दिसत आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेत अजित पवार (Ajit Pawar) यांनीही प्रतिक्रीया दिली असून, टीईटी घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

    टीईटी घोटाळयात मुलींची नाव आल्यानंतर माज मंत्री यांनीही हे अमान्य करत बदनामी साठी कट रचल्याचा आरोप केला आहे. तसेच चौकशीचीही मागणी केली आहे. दरम्यान, या घोटाळ्यातील दोषींनवर कठोर कारवाई करावी आणि सत्य समोर आणावं. ज्याची चूक असेल ते कळावं आणी कुणाची चूक नसेल तर तेही सगळ्यांसमोर यावं असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले आहेत.

    आरोग्य सेवक भरती प्रकरणचा पुणे पोलिसांकडून तपास सुरू असतानाच दुसरीकडे टीईटी परीक्षेत देखील घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. सध्या सगळीकडे शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्याबद्दल चर्चा सुरू आहे. या प्ररकणी आधीच काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. मात्र, आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावं समोर आली आहे. तसेच या प्रकरणी खासगी कंपन्यांचे संचालक, परीक्षा देणारे विद्यार्थी आणि परीक्षा परिषदेचे अधिकारी यांच्या संगनमताने झाल्याचे समोर आल्यानंतर यातील काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. ईडीकडून (ED) देखील या प्रकरणाची समांतर चौकशी सुरू आहे. तसेच जे परीक्षा देणारे विद्यार्थी या प्रकरणात दोषी आढळले आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे.