अजित पवार यांनी आमच्यासोबत यावं; भाजपच्या ‘या’ नेत्याचं खळबळजनक विधान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा भाजपमध्ये यावं असं विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. ऐन विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हे विधान केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

    अहमदनगर : एकीकडे राज्यात राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलं असतानाच दुसरीकडे भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे.

    राधाकृष्ण विखे पाटील नेमकं काय म्हणाले? 

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा भाजपमध्ये यावं असं विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. ऐन विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हे विधान केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

    ‘देवेंद्र फडणवीस कणखर आणि डायनॅमिक नेते आहेत, तर अजित पवार शिस्तप्रिय आणि कार्यक्षम आहेत. त्यांनी पुन्हा आमच्यासोबत लवकर येण्याचा निर्णय घ्यावा,’ असेही विखे पाटील म्हणाले. अहमदनगर येथील एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे विधान केलं आहे.

    दरम्यान पवार कुटुंबियांत कोणताही वैयक्तिक संघर्ष नाही. आमच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत. त्यातून राजकीय मतभिन्नता आहे, असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा भाजपसोबत येण्याचे निमंत्रण दिले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आता राधाकृष्ण विखे पाटलांना काय उत्तर देण्यात येईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.