‘अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील’; मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा

राज्यात राजकीय घडामोडी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दरबारी या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अन्न व औषधी प्रशासनमंत्री धर्मराव बाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी मोठे वक्तव्य केले.

    मुंबई : राज्यात राजकीय घडामोडी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दरबारी या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अन्न व औषधी प्रशासनमंत्री धर्मराव बाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी मोठे वक्तव्य केले. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री व्हावेत ही आमच्या मनातील इच्छा असून, ते नक्की लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याचे धर्मराव आत्राम यांनी म्हटले आहे.

    धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, ‘अजित पवारांचा नाराजीचा प्रश्न नाही. चंद्रकांत पाटील नाराज नाहीत, त्यांच्याकडे एका जिल्ह्याची जबाबदारी होती. आता त्यांना दोन जिल्ह्याची जबाबदारी मिळाली आहे. विदर्भात सुपारीचा हब आहे. आतापर्यंत 2 कोटी 24 लाखांची अवैध सुपारी जप्त केली आहे. चंद्रपूर, नागपुरातही कारवाई झालेली आहे. आम्ही अनेक योजनांच्या बाबतीत महाविकास आघाडीच्या काळात लावलेली स्थगिती उठविली आहे’.

    ई-टेंडर प्रक्रिया प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जाते. मेडिसीनचा तुटवडा नाही. मागील पाच-सहा दिवस सुट्टीचे दिवस होते. खाजगी रुग्णालय सुद्धा मोठ्या प्रमाणात बंद होते. त्यामुळे अचानकपणे नांदेडमध्ये सरकारी रुग्णालयात रुग्णसंख्येचा फ्लो वाढला. यात कमी वजनाचे बाळ असल्याने ती घटना घडली आहे.