ajit-pawar-PC_d

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पर्वताने आता पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. संपूर्ण राज्यातील पक्ष संघटनेच्या जबाबदारीचे वाटप गटाच्या नऊ मंत्र्यांमध्ये केले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे.

    सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पर्वताने आता पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. संपूर्ण राज्यातील पक्ष संघटनेच्या जबाबदारीचे वाटप गटाच्या नऊ मंत्र्यांमध्ये केले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. या निमित्ताने अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यावर लक्ष ठेवले आहे. राज्यात शरद पवार व अजि पवार गट वेगवेगळे झाले असले तरी अद्याप दोन्ही गटाकडून एकमेकांवर शरसंधान झालेले नाही. मात्र अजित पवार गटाने आता राज्यात पक्ष संघटना वाढीसाठी ठोस पावली उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना मंत्री निहाय जिल्ह्याच्या जबाबदारीचे पत्र प्रसिद्धीस दिले आहे. राष्ट्रवादीचे नऊ मंत्री आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर राज्यातील ३६ जिल्ह्यांची पक्ष संघटना वाढीची जबाबदारी सोपवली गेली आहे. या जबाबदारीच्या वाटपात अजित पवार यांच्याकडे सातारा जिल्हा आला आहे त्यांनी यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे.

     शरद पवारांच्या दाैऱ्याकडे लक्ष
    दहिवडीमध्ये शरद पवार यांचा लवकरच दौरा होत आहे. या दौऱ्याकडे अजित पवार गटाने बारकाईने लक्ष ठेवले आहे. त्यानुसार जिल्ह्यात राष्ट्रवादीची निर्मिती कशी असणार, याचा अंतिम निर्णय अजित पवार घेणार आहेत.

     पदािधकाऱ्यांशी संवाद साधणार
    राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अजित पवार गटाचे मंत्री प्रत्यक्ष जाऊन सभा, कार्यकर्त्यांशी, मतदारांशी संवाद साधणार अाहेत. शासनाच्या योजनांचा प्रचार, प्रसार, पक्ष संघटना वाढीसाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना करणार अाहेत.