Today, the country does not see a leader who can take the country forward except Narend Modi; Ajit Pawar's big statement at the rally in Kolhapur

  शरद पवार यांना राजकारणातून घरी बसवण्यासाठी अजित पवार यांना भाजपानं सुपारी दिली आहे. त्यापद्धतीनं अजित पवार काम करत आहेत, असं विधान माजी मंत्री, अनिल देशमुख यांनी केलं होतं. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत देशमुखांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मंत्रीपद न मिळाल्यानं देशमुख आमच्याबरोबर आले नाहीत, असा दावा अजित पवारांनी केला आहे. ते कर्जतमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

  या कारणाने अनिल देशमुखांना घेता येणार नाही….

  अजित पवार म्हणाले, “अनिल देशमुख माझ्याबरोबर सर्व बैठकांना उपस्थित होते. ‘मला मंत्रीमंडळात स्थान मिळालं पाहिजे,’ असं देशमुखांनी म्हटलं होतं. पण, भाजपाकडून सांगण्यात आलं की, ‘आम्ही देशमुखांवर सभागृहात आरोप केले आहेत. लगेच मंत्रीमंडळात त्यांना स्थान दिलं, तर आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे अनिल देशमुखांना घेता येणार नाही.’”

  म्हणून मी तुमच्याबरोबर येणार नाही

  “मग, मंत्रीपदाच्या यादीतून देशमुखांचं नाव वगळलं गेलं. त्यावर देशमुखांनी सांगितलं, ‘मला मंत्रीपद नाही तर मी तुमच्याबरोबर येणार नाही.’ ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे,” असं अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं.

  बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवार देणार का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “मी बारामती, रायगड, सातारा, शिरूर येथे उमेदवार दिल्यावर, बाकीचे कोण काय करणार? याचं मी काय सांगू. चारही ठिकाणी उमेदवार दिले जातील. ते निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं जाईल.”