अजित पवारांचा वर्धा दौरा, हिंगणघाटमध्ये अतिवृष्टी झालेल्या भागाची केली पाहणी

आताची परिस्थिती बघता ,शेतकऱ्यांची झालेले हाल बघता आणि लोकांच्या झालेल्या नुकसानाबाबत आपल्याला त्यात बदल करावा लागेल अशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी करु असे ते म्हणाले. 

    वर्धा : विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) सध्या यवतमाळ (Yavatmal) आणि वर्धा (Wardha)जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. नुकताच त्यांनी हिंगणघाट परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तिथल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

    अजित पवार यांनी आज वर्धा जिल्हाचा दौरा केला. यावेळी त्यांनी वर्धा जिल्ह्याच्या अतिवृष्टी भागात पाहणी केली. वर्धा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सध्या पावसामुळे नुकसान झाले आहे. दरम्यान, याचा फटका हिंगणघाट तालक्यालाही बसला असून त्यांनी अतिवृष्टीची त्यांनी पाहणी केली. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या पाहणी दौऱ्यामध्ये अजित पवार यांच्य सोबत होते. महागाई वाढली आहे.

    काय म्हणाले अजित पवार

    आम्ही जेव्हा सरकारमध्ये होतो तेव्हा, एस.डी.आर.एफ चे नोर्म बाजुला ठेवले. आणि त्याच्या तिप्पट मदत राज्यातल्या बाधित शेतकऱ्यांना केल्याचे निर्णय घेतले होते. तशाच प्रकारचे निर्णय आताचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतले पाहिजे. अशी माझी स्पष्ट मागणी आहे. आताची परिस्थिती बघता ,शेतकऱ्यांची झालेले हाल बघता आणि लोकांच्या झालेल्या नुकसानाबाबत आपल्याला त्यात बदल करावा लागेल अशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी करु असे ते म्हणाले.