संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

अकोला जिल्ह्याला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बाळापूर तालुक्यातील टाकळी खोजबळ येथे रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे २० मेढऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

    बाळापूर : अकोला जिल्ह्याला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बाळापूर तालुक्यातील टाकळी खोजबळ येथे रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे २० मेढऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याबरोबरच पाच बकऱ्या गंभीर जखमी झाल्याचे मेंढपाळाने सांगितले.

    अकोला जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता. बाळापुर तालुक्यातील टाकळी खोजबळ येथे बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथील मेंढपाळ शालिकराम बिचकुले हे आपल्या मेंढऱ्यांसह टाकळी येथे आले होते. टाकळी येथील शेतकरी शिवाजी पाटील यांच्या शेतामध्ये त्यांची मेंढर चरत होती. दरम्यान रात्रीच्या सुमारास झालेल्या विजांच्या कडकडासह मुसळधार पावसामुळे बिचकुले यांच्या २० बकऱ्यांचा मृत्यू झाला.

    या घटनेत पाच बकऱ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर शेतकरी कुटुंब हादरुन गेले. शासनाने आम्हांला मदत करावी अशी मागणी शालिकराम बिचकुले (मेंढपाळ, लाखनवाडा जिल्हा बुलढाणा) यांनी केली.