अकोला ग्रामपंचायत निवडणुकीत सहापैकी दोन ठिकाणी शिवसेना आणि प्रहारने उघडले खाते

सहापैकी दोन ठिकाणी शिवसेनेचे सरपंच विजयी झाले आहेत. तर वंचित बहुजन आघाडी, भाजप, प्रहार आणि अपक्ष यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. तर पहिल्यांदा या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बच्चू कडू (Bachu kadu) यांच्या प्रहार (Prahaar) पक्षाने खात उघडलेल आहे.

    अकोला : अकोला जिल्ह्यातील ६ ग्रामपंचायतीचा निकाल (Akola Grampanchayat election result) हाती आला असून, यामध्ये दोन ठिकाणी शिवसेनेचा (Shivsena) सरंपच निवडून आले आहेत. तर ६ ग्रामपंचायतपैकी पाच ग्रामपंचायत या अकोट तालुक्यातील आहेत. तर १ ग्रामपंचायत ही बाळापूर (Balapur) तालुक्यातील आहे. या सहापैकी दोन ठिकाणी शिवसेनेचे सरपंच विजयी झाले आहेत. तर वंचित बहुजन आघाडी, भाजप, प्रहार आणि अपक्ष यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. तर पहिल्यांदा या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बच्चू कडू (Bachu kadu) यांच्या प्रहार (Prahaar) पक्षाने खात उघडलेल आहे.

    दरम्यान, पहिल्यांदा या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने खात उघडले असल्यामुळं बच्चू कडू व प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यामध्ये आनंदाचे वातावरण असून, कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करत आहेत.