Akola has the highest rainfall while Yavatmal has the lowest rainfall! Amravati division has received 74.2 mm of rainfall so far

हवामान विभागाने ( Meteorological Department) चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे. मात्र अनेक ठिकाणी अद्यापही मान्सूनच्या धारा बरसल्या नसल्याची स्थिती आहे. अशा भागात अद्यापही कोरडवाहू शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे.

  अमरावती : हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तविलेल्या अंदाजानुसार अमरावती विभागातील (Amravati division) काही जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाले आहे.  मात्र आतापर्यंत सरासरी १०८.२ एमएम पावसाची आवश्यकता असतांना केवळ ७४.२ एमएम पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी जून २०२१ मध्ये १६५.८ एमएम पावसाची नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदा कमी पाऊस पडला आहे.

  अकोला (Akola) येथे सर्वाधिक ८०.९ एमएम ( Maximum 80.9 mm ) पावसाची नोंद झाली आहे तर सर्वात कमी पावसाची नोंद यवतमाळ (Yavatmal) मध्ये ६८.१ एमएम (68.1 mm) पावसाची नोंद झाली आहे.

  हवामान विभागाने ( Meteorological Department) चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे. मात्र अनेक ठिकाणी अद्यापही मान्सूनच्या धारा बरसल्या नसल्याची स्थिती आहे. अशा भागात अद्यापही कोरडवाहू शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. पुढील तीन दिवसात दमदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे चांगला पाऊस बरसल्यास पेरणीला जोर येणार आहे.

  असा आहे पावसाचा अंदाज

  सध्या वातावरणात गारवा आहे. अधूनमधून ढगाळ वातावरणासह हलक्या सरी देखील बरसत आहेत. दरम्यान अमरावतीसह अकोला, बुलढाणा, वाशीममध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता पुढील तीन दिवसात वर्तविण्यात आली आहे. उर्वरित विदर्भात बऱ्याच ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. २४ जूनला(June 24) संपूर्ण विदर्भात, २५ जुनला (June 25) अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, गोंदिया, भंडारा येथे विखुरलेल्या स्वरूपात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येऊ शकतो. २६ जूनला देखील चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

  पावसाची आकडेवारी (एमएम मध्ये)

  जिल्हा         झालेला पाऊस         टक्केवारी

  अमरावती         ७२.०९                 ६८.०२

  बुलढाणा          ७८.०७                 ७७.००

  अकोला           ८०.०९                 ८०.०६

  वाशीम            ७५.०७                 ६२.००

  यवतमाळ         ६८.०१                 ५६.०७

  एकूण             ७४.०२                 ६८.०६

  २२ तारखेला झालेला पाऊस

  दरम्यान २२ जून या एकाच दिवशी विभागात ७.२ दोन एमएम पाऊस झाला. त्यामध्ये बुलढाणा १०.१ एमएम, अकोला २.२ एमएम, वाशीम ७.२ एम, अमरावती १० एमएम आणि यवतमाळ मध्ये ५ एमएम पावसाची नोंद झाली आहे.