आळंदी नगरपरिषद वारकऱ्यांच्या स्वागतास सज्ज; पोलिसांचा फौजफाटाही राहणार तैनात

आषाढी पायीवारी माउलींचे पालखी सोहळ्याच्या आनंदवारी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकरी भाविक आणि नागरिकांच्या स्वागतासाठी आळंदी सज्ज झाली आहे. पालखी सोहळा प्रस्थान काळात भाविकांना सेवासुविधा देण्यासाठी पुणे प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे तयारी करण्यात आल्याची माहिती आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.

    आळंदी : आषाढी पायीवारी माउलींचे (Ashadhi Wari 2022) पालखी सोहळ्याच्या आनंदवारी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकरी भाविक आणि नागरिकांच्या स्वागतासाठी आळंदी सज्ज झाली आहे. पालखी सोहळा प्रस्थान काळात भाविकांना सेवासुविधा देण्यासाठी पुणे प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे तयारी करण्यात आल्याची माहिती आळंदी नगरपरिषद (Alandi Municipal Council) मुख्याधिकारी अंकुश जाधव (Ankush Jadhav) यांनी दिली.

    मंगळवारी (दि.२१) आळंदी मंदिरातून श्रींचे वैभवी पालखी सोहळ्याचे प्रस्थान होत आहे. यासाठी आळंदीत राज्य परिसरातून लाखो वारकरी, भाविक दिंड्या दिंड्यातून आळंदीत येत असतात. या भाविकांना विविध नागरी सेवासुविधा देण्यासाठी आळंदी नगरपरिषदेने पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, खेडचे प्रांत विक्रांत चव्हाण, तहसीलदार तथा आळंदी नगरपरिषद प्रशासक वैशाली वाघमारे, आळंदी मंडलाधिकारी स्वाती जोशी यांचे मार्गदर्शनात तयारी केली आहे.

    यात वेळोवेळी मिळालेल्या सूचनेप्रमाणे, नागरी सुविधा प्रभावी देण्याची तयारी विविध विभाग आणि खातेप्रमुख यांच्यासमवेत सुसंवाद ठेवत कामकाज केले आहे. यामध्ये पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, अतिक्रमण विभाग, स्वच्छता विभाग, आस्थापना विभाग, विद्युत विभागांचा समावेश आहे. भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण आणि वारकरी भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.