अली, जनाब वगैरे उद्धव ठाकरे यांना भूषणावह वाटते का? देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना सवाल, म्हणाले…

सभेसाठी मालेगावत ऊर्दूमधून बॅनर झळकले आहेत, यावर विरोधकांनी टिका केली आहे. या ऊर्दू बॅनरवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुंबई- आज मालेगामध्ये ठाकरे गटाचे (Thackeray group) प्रमुख उद्धव ठाकरे हे सभा घेणार आहेत. शिंदे गटाने खेडमध्ये जोरदार सभा घेतल्यानंतर आता ठाकरे गटाकडून आज रविवार (२६ मार्च) मालेगावमध्ये सभा होणार असून, या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सभेचा दोन दिवसांपूर्वी टिझर लॉँन्च करण्यात आला होता, या टिझरमधून शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच दोनच गुढी पाडव्याला राज ठाकरेंनी जोरदार टिका उद्धव ठाकरेंवर केली होती, त्याला उद्धव ठाकरे उत्तर देणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागलं असताना, सभेसाठी मालेगावत ऊर्दूमधून बॅनर झळकले आहेत, यावर विरोधकांनी टिका केली आहे. या ऊर्दू बॅनरवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

अली जनाब वगैरे जे काही आहे ते उद्धव ठाकरे यांना भूषणावह वाटते का? हे त्यांनाच विचारा. असा हल्लाबोल उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ठाकरेसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मालेगाव येथे जाहीर सभा होणार आहे. शहरातील कॉलेज मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान ही सभा होईल. मात्र मालेगावमध्ये उर्दूत लागलेल्या बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच शिंदे गटातील नेत्यांनी देखील या ऊर्दू बॅनरवरुन टिका केली आहे, त्यानतर आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टिका केली आहे.

आम्ही लांगुलचालनाच्या विरोधात…

दरम्यान, पुढे बोलताना म्हणाले की, उर्दू ही एक भाषा आहे, त्या भाषेत कोणी काही म्हटले तर आम्हाला काही हरकत नाही. आमचे म्हणणे एवढेच आहे आम्ही कोणत्याही धर्माविरोधात नाही. पण आम्ही लांगुलचालनाच्या विरोधात आहोत. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. शहराच्या मुस्लिमबहूल पूर्व भागात उर्दू भाषेतदेखील स्वागताचे बॅनर झळकले असून त्यावर ‘जनाब उद्धव ठाकरे’ असा उल्लेख असल्याने बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळं मतांसाठी काहीही करणे किंवा लांगुलचालन करणे याविरोधात आम्ही असल्याचं फडणवीस म्हणाले.