अलिबाग जामा मस्जिदमध्ये चोरी, चोर सीसी टीव्ही मध्ये कैद, सदर चोरट्याला पकडण्याची मुस्लिम समाजाची मागणी

सदर घटना मशिदीच्या बाहेर असलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून निळा टी शर्ट असलेला चोरटा मोठ्या पिशवीमध्ये चंदा पेटी घेऊन बाहेर पडत असल्याचे दिसून येते.

    अलिबाग : शहरातील जामा मस्जिदमध्ये शिरून तेथील चंदा पेटी चोरी केल्याची घटना गुरुवारी झाली. सदर चोर सीसी टीव्ही मध्ये कैद झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे. अलिबाग शहरातील मुख्य बाजारपेठेत मुस्लिम समाजाच्या प्रार्थना स्थळ असलेल्या आणि रहदारीच्या ठिकाणी असूनही चोरटयाने आत शिरून तेथे असलेली चंदा पेटी (दान पेटी) उचलून पोबारा केला.

    सदर घटना मशिदीच्या बाहेर असलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून निळा टी शर्ट असलेला चोरटा मोठ्या पिशवीमध्ये चंदा पेटी घेऊन बाहेर पडत असल्याचे दिसून येते. या मस्जिद पासून अलिबाग पोलिस ठाणे तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यालय काहीच अंतरावर असल्याने पोलिसांना मोठे आव्हान ठरले. सदर चोरट्याला पकडण्याची मागणी मुस्लिम समाजाने केली आहे.