बाप-लेकाचा वीज पडून जागीच मृत्यू, अलिबाग तालुक्यातील धक्कादायक घटना

अलिबाग तालुक्यात शनिवारी रात्री विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. अशातच वडील रघुनाथ म्हात्रे व मुलगा ऋषीकेश हे दोघे काल रात्री शेतात गेले होते.

    अलिबाग : अलिबाग तालुक्यातील पेझारी नजीकच्या दिवलांग येथील रघुनाथ हिराजी म्हात्रे (56) व त्‍यांचा मुलगा ॠषिकेश रघुनाथ म्हात्रे या बाप-लेकाचा वीज पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दि. ३० ऑक्टोबर रोजी घडली.

    अलिबाग तालुक्यात शनिवारी रात्री विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. अशातच वडील रघुनाथ म्हात्रे व मुलगा ऋषीकेश हे दोघे काल रात्री शेतात गेले होते. यावेळी त्‍यांच्यावर वीज पडली व त्यांचा जागीच मृत्‍यू झाला. त्या दोघांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले होते. दरम्यान, तहसिलदार विक्रम पाटील यांनी मयत रघुनाथ म्हात्रे व मुलगा ऋषिकेश म्हात्रे यांच्या घरी भेट देऊन त्यांची पत्नी व मुलगा यांचे सांत्वन केले.

    दरम्यान जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार
    समुद्र खाडी किनाऱ्यावरील सखल भागांतील नागरिकांनी सतर्क रहावे.
    वयोवृद्ध, अपंग, गरोदर महिला, लहान मुले यांची काळजी घ्यावी.
    पुरेसा औषध साठा, पिण्याचे पाणी, ड्राय फूड, बॅटरी, टॉर्च, मेणबत्ती, रेडिओ सोबत बाळगावा.
    अनावश्यक असेल तर घराच्या बाहेर पडू नये.
    विजेचे खांब, झाडे यापासून लांब राहावे.
    कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी जवळच्या पोलीस स्टेशन तसेच तहसीलदार यांचे कार्यालयास संपर्क साधावा.