प्रादेशिक पक्ष विलीनीकरणावर शरद पवारांचं पुन्हा मोठं विधान; म्हणाले, ‘सरसकट पक्ष काँग्रेसमध्ये…’

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रादेशिक पक्ष विलीनीकरणावर बुधवारी (दि.9) एक विधान केले होते. त्यावरून मोठे मतभेद झाल्याचे पाहिला मिळाले. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा विधान करत स्पष्टीकरण दिले. 

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रादेशिक पक्ष विलीनीकरणावर बुधवारी (दि.9) एक विधान केले होते. त्यावरून मोठे मतभेद झाल्याचे पाहिला मिळाले. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा विधान करत स्पष्टीकरण दिले.

    शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या जवळ जाणारा पक्ष  आहे. या पक्षाच्या स्थापनेपासून आम्ही काम करत आहोत. अनेक वर्षांचा एकत्रित काम करण्याचा आमचा अनुभव आहे. त्यामुळे अधिक एकत्र येऊन काम करण्याची आमची भावना वाढली तर आश्चर्य वाटायला नको, असं ते म्हणाले.

    तसेच जरी प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होणार असले तरी सरसकट पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत, असेही त्यांनी आज स्पष्ट केलं.