
या धमकीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. सगळी सुरक्षा गद्दारांना दिली जातेय, मात्र विरोधकांना नाही. असं म्हणत धमकीवर त्यांनी भाष्य केलं.
मुंबई : मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमकीत वाढ होत असताना, आता ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी (threat) देण्यात आली आहे. त्यामुळं खळबळ माजली असून, याबाबत अधिक तपास पोलीस (Police) करत आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार धमकी देणारा व्यक्ती पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. (death threat to mp sanjay raut threat) दरम्यान, या धमकीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. सगळी सुरक्षा गद्दारांना दिली जातेय, मात्र विरोधकांना नाही. असं म्हणत धमकीवर त्यांनी भाष्य केलं.
चाटूगिरीमुळं सरकार पडलं व नवं सरकार आलं…
दरम्यान, पुढे बोलताना राऊत म्हणाले की, सध्या राज्यात आणि देशात दहशतीचे वातावरण आहे. सद्याचे राजकारण चाटूगिरीचे झाले आहे, चाटूगिरीमुळं सरकार पडलं, व चाटूगिरीमुळं नवीन सरकार आले. हे सरकर आल्यापासून जाणीवपूर्वक दंगली घ़डवल्या जाताहेत. भाजपा व मिंध्ये गटाला माहित आहे की, जनमत आपल्या बाजूनी नाहिये. म्हणून ते दंगली घडवून राजकारणात काही करता येईल का, हे पाहत आहेत. पण याला जनता बळी पडणार नाही, असा घणाघाती हल्लाबोल संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला.
तर राज्यात भूकंप होईल…
जे घडलंय ते तुम्हीच घडवलायं, असं राऊत म्हणाले. दंगली घडवायला हेच जबाबदार आहेत, दंगलीच्या माध्यमातून जनमत आपल्या बाजूनी फिरवण्याचा याचा प्रयत्न आहे. सध्या विरोधकांचा आवाज दाबला जातोय, राज्यात दहशतवाद माजला आहे, मी खरं बोललो तर राज्यात भूकंप होईल, असा इशारा देखील यावेळी संजय राऊतांनी दिला.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी…
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी पंजाबमधील खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. तर धमकी देणारा व्यक्ती पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमकीत वाढ होत असताना, आता ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच याआधी संजय राऊतांनी आपणाला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली होती, असा आरोप केला होता. त्यानंतर आता पुन्हा संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. त्यामुळं त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.