
चुंबन हा गुन्हा नसेल तर मग शिवसैनिकांना अटक करण्याचे कारण काय? संबंधित आमदार व महिला कार्यकर्त्यास चुंबन प्रकरणाचा मनस्ताप झाला हे मान्य केले तरी, सार्वजनिक ठिकाणी घेतलेले साधे चुंबन हे अश्लील कृत्यात मोडते काय याचा खुलासा करावा, मिंधे गट व फडणवीस हे अनैतिक पदधतीने एकत्र आले आहेत, अशी सामनातून आज टिका करण्यात आली आहे.
मुंबई – महाराष्ट्रात ‘चुंबना’वर चर्चा सुरू आहे. शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. देशात ईडी, (ED) सीबीआयने (CBI) भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. गौतम अदानीच्या विरोधात वातावरण तापले आहे. त्यावर पाणी टाकण्यासाठी विरोधकांच्या घरांवर धाडी व अटका सुरू आहेत. सगळाच ‘नाटू नाटू’चा प्रकार. हा मजकूर लिहीत असताना सीबीआयचे पथक लालू यादव यांच्या घरी पुन्हा पोहोचले आहे. किडनीच्या विकारामुळे लालू यादव यांचा आवाज क्षीण झाला आहे. त्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. त्याही अवस्थेत त्यांनी मोदी सरकारला सुनावले. ‘मी शेवटपर्यंत लढेन, पण शरण जाणार नाही.’ तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव यांची कन्या कविता यांना ‘ईडी’ने समन्स पाठवले. त्याच दिवशी मी दूरध्वनीवरून कविता यांच्याशी संवाद साधला. त्या स्पष्टपणे म्हणाल्या, ‘मी गुडघे टेकणार नाही. माझ्यावरील सर्व आरोप बनावट आहेत. मी सत्यासाठी लढत राहीन.’ नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या अवतीभवतीच राजकारण फिरत आहे. विरोधक लढण्याच्या मूडमध्ये आहेतच, पण विरोधकांत अद्यापि एकीचे दर्शन होत नाही. हेच श्री. मोदी व शहांचे बलस्थान आहे. ‘ईडी’सारख्या संस्था कायद्याचा गैरवापर करून विरोधकांना जेरीस आणतात. त्याविरुद्ध सर्व विरोधी खासदारांनी एकत्र येऊन ‘ईडी’ कार्यालयावर मोर्चा काढावा. गौतम अदानी यांनी केलेल्या लुटमारीची तक्रार ‘ईडी’ संचालकांकडे करावी असे ठरले; पण त्या तक्रारीवर ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस व महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसने ना ‘ईडी’वरील मोर्चात सहभागी झाले नव्हते. पण आता विरोधकांनी एकत्र आले पाहिजे असं आज सामनातून (Saamana) म्हटलं आहे.
‘क्राऊड फाडग’ व त्या पशाचा गरव्यवहार हा मना लाँडरिंग कायद्याच्या अंतर्गत येणारा विषय. साकेत गोखले हा तृणमूल काँगेसचा प्रवक्ता सध्या याच गुन्ह्याखाली ‘ईडी’च्या अटकेत आहे व चार महिने उलटले तरी त्याला जामीन मिळत नाही. किरीट सोमय्या यांनी ‘विक्रांत युद्धनौका वाचवा’ या मोहिमेखाली लोकांकडून मोठय़ा प्रमाणात ‘क्राऊड फंडिंग’ केले व ते पैसे कोठे वापरले याचा हिशेब दिला नाही. साकेत गोखले यांनी जर क्राऊड फंडिंगचा गुन्हा केला, मग त्याच गुन्हयाखाली किरीट सोमय्या मोकळे कसे? त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. सेशन कोर्टाने त्यांना जामीन नाकारला, पण हायकोर्टाने त्यांना जामीन दिला व फडणवीस गृहमंत्री होताच विक्रांत आर्थिक गैरव्यवहारास ‘क्लीन चिट’ देण्यात आली. विरोधकांना अडकवायचे व सत्ताधारी पक्षाच्या गुन्हेगारांना मोकळे सोडायचे असे ‘कायद्याचे राज्य’ सध्या सुरू आहे. मोदी व शहा सांगतील तीच पूर्व, तोच न्याय, तोच कायदा असे सध्या झाले आहे. कधीकाळी या देशात महान माणसे जन्माला आली याचा विसर पडू लागला आहे. असं सामनातून म्हटलं आहे.
महाराष्ट्राचे सरकारही मोदींप्रमाणे बेकायदेशीर पद्धतीनेच राजशकट चालवीत आहेत. शिवसेनेच्या शाखांत पोलीस घुसवून शिंदे गटाचे लोक ताबा मिळवत आहेत. पैसा व पोलिसी बळाचा वापर करून कार्यालयांवर ताबा मिळवाल, पण जनभावना कशी विकत घेणार, हा प्रश्न आहे. महाराष्ट्रात एका जाहीर चुंबनाचे प्रकरण सध्या सगळ्यांचेच मनोरंजन करीत आहे. शिंदे गटाच्या एका आमदाराने त्यांच्याच महिला पदाधिकाऱ्याचे जाहीर चुंबन घेतले. त्या नाजूक चुंबनाचे राजकीय पडसाद उमटत आहेत. हे चुंबनाचे जिवंत दृश्य समाजमाध्यमांतून लगेच जगभर पोहोचले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत हे चुंबन प्रकरण घडले. आता या चुंबन प्रकरणात शिवसेनेच्या तरुण कार्यकर्त्यांच्या घरांवर धाडी घालून अटका झाल्या. सध्याच्या युगात प्रत्येक गोष्ट समाज माध्यमातून क्षणात पसरते व त्याचा दोष तुम्ही कुणाला देणार? मुळात चुंबन घेणे हा गुन्हा आहे काय यावर निर्णय व्हायला हवा. चुंबन हा गुन्हा नसेल तर मग शिवसैनिकांना अटक करण्याचे कारण काय? संबंधित आमदार व महिला कार्यकर्त्यास चुंबन प्रकरणाचा मनस्ताप झाला हे मान्य केले तरी, सार्वजनिक ठिकाणी घेतलेले साधे चुंबन हे अश्लील कृत्यात मोडते काय याचा खुलासा करावा, मिंधे गट व फडणवीस हे अनैतिक पदधतीने एकत्र आले आहेत, अशी सामनातून आज टिका करण्यात आली आहे.