‘शिंदे गटात गेलेले सगळे परत येतील; पण आम्ही…’; संजय राऊत यांचं मोठं विधान

शिवसेना पक्षफुटीनंतर शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) वेगळे झाले आहेत. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला.

नाशिक : शिवसेना पक्षफुटीनंतर शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) वेगळे झाले आहेत. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये सातत्याने टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं विधान केलं आहे.

संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘आम्हीच खरी शिवसेना असून, सध्याच्या सरकारचं काही खरं नाही. कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. आज एकीकडे आंदोलनं सुरू आहेत पण दुसरीकडे सरकार वेगळ्याच कामात व्यस्त आहे. आता भाजपसोबत गेलेले आमदार खऱ्या शिवसेनेत परत येणार आहेत. मात्र, एकनाथ शिंदे परत येणार नाहीत आणि त्यांना आम्ही घेणारही नाही’. तसेच मालेगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो गद्दारांचा नाही म्हणत त्यांनी यावेळी अप्रत्यक्षरित्या दादा भुसे यांना देखील टोला लगावला.

उद्धव ठाकरेंची मालेगावला सभा

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची 26 मार्चला मालेगाव येथे सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत आज मालेगावमध्ये दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेडमध्ये सभा झाली होती. त्यानंतर ते राज्यातील इतर ठिकाणीही सभा घेणार आहेत. 26 मार्चला उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये सभा होणार आहे.

…पण आम्ही एकनाथ शिंदेंना घेणार नाही

एकनाथ शिंदे सोडून शिवसेनेत सगळे पुन्हा येतील. पण आम्ही एकनाथ शिंदे यांना घेणार नाही. राज्यातील मुस्लिम समाजही आमच्या पाठीमागे आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.