‘आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या’; महाराष्ट्र ठेलारी महासंघाची मागणी

धुळे जिल्ह्यातील मेंढपाळ ठेलारी समाजावर वेळोवेळी अन्याय केला जात असून, जिल्हा प्रशासनही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र ठेलारी महासंघाने केला आहे. त्यामुळे ठेलारी समाजातील १० ते १२ तरुणांनी इच्छा मरणाची तयारी केली आहे.

    धुळे : धुळे जिल्ह्यातील मेंढपाळ ठेलारी समाजावर वेळोवेळी अन्याय केला जात असून, जिल्हा प्रशासनही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र ठेलारी महासंघाने केला आहे. त्यामुळे ठेलारी समाजातील १० ते १२ तरुणांनी इच्छा मरणाची तयारी केली आहे. आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या अन्यथा आम्ही १५ ऑगस्ट रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विष प्राशन करुन तरुण इच्छा मरण पत्कारू, असा गंभीर इशारा यावेळी त्यांनी दिला.

    या वेळी महाराष्ट्र ठेलारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शिवदास वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आले. धुळे जिल्हातील मेंढपाळ ठेलारी समाज गेल्या अनेक वर्षापासुन आपल्या हक्काच्या मेंढी वनचराई जमिनीची मागणी करत आहे. त्याबाबत समाजाच्या वतीने अनेक वेळा शासनास व प्रशासनाश वेळोवेळी निवेदन अथवा आंदोलन करुन आपली मागणी प्रशासना समोर मांडलेली आहे. परंतू प्रशासनाने वेळोवेळी मेंढपाळ ठेलारी समाजाला तात्पपुरते आश्वासन देवून वेळ मारुन नेली आहे. त्यामुळे मेंढपाळ ठेलारी समजाला शासनावर व प्रशासनावर विश्वास शिल्लक राहिलेला नाही. अशी प्रतिक्रिया ठेलारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शिवदास वाघमोडे यांनी दिली.

    प्रशासनाकडून मेंढपाळ समाजाला न्याय मिळणार नाही, अशी भावना निर्माण झाल्याने १० ते १२ तरुणांनी इच्छा मरणाची तयारी केली आहे. मेंढपाळ समाजावरील अन्याय दुर करावा, अन्यथा १५ ऑगस्टला हेच तरुण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विष प्राशसन करुन इच्छामरण पत्कारतील असा इशारा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शिवदास वाघमोडे, रामदास कारंडे, दिनेश सरक यांनी दिला आहे.