Supriya Sule (11)

आगामी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या ही निवडणूका एकत्रित होतील तशाप्रकारे केंद्राचे प्रयत्न सुरू असून पक्षातील कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. असे आवाहन खा. सुप्रिया सुळे यांनी केले.

    बावडा  : आगामी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या ही निवडणूका एकत्रित होतील तशाप्रकारे केंद्राचे प्रयत्न सुरू असून पक्षातील कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. असे आवाहन खा. सुप्रिया सुळे यांनी केले.

    काल बावडा नरसिंगपूर जि. प. गटात अडीअडचणी जाणून घेण्यासाठी धावता दौरा केला. यावेळी टनु येतील जाहीर समारंभात त्या बोलत होत्या. केंद्रातील भाजप सरकार हे हुकूमशाही व जन विरोधी असल्याने देशाची अधोगती झाली आहे. या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावरही नाव न घेता टीका केली. केंद्राचे राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचा इंदापूर तालुक्यात भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी याच दिवशी दौरा आयोजित केला होता. मात्र या कार्यक्रमास पक्ष म्हणून नव्हे तर मतदार संघाच्या खासदार तसेच इंदापूरचे चे आमदार यांना निमंत्रित करणे आवश्यक होते. मात्र तसे न करता आमदार व खासदार पदाचा अवमान केला. त्याचबरोबर दिल्ली येथे महिला कुस्तीपटू वर झालेल्या पोलिसी लाठे माराचा तसेच ओडिशा रेल्वे अपघातात 288 लोकांचा मृत्यू नव्हे तर खूनच झाला असल्याबाबत आपण संसदेत आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या अपघाताचा सीबीआय तपास करणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले असले तरी त्यातून काही निष्पन्न होणार नसून सीबीआय, ईडी इत्यादी संस्था या मोदी सरकारच्या प्रभावाखाली आहे.
    यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपल्या कामाचा लेखा-जोखा सांगत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर प्रखर टीका केली.

    हर्षवर्धन पाटलांनी दहा वेळा नारळ फोडला.
    बावडा नरसिंगपूर मुख्यमार्गावरील टनु या दोन किलोमीटर रस्त्याची पूर्ण वाताहत झाली असून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या रस्त्याच्या कामाचे 10 नारळ फोडले. तरीही अजून काम झाले नाही. असे सातवीतील एका विद्यार्थिनीने लिहून दिलेले भाषण वाचन केले. त्यावर हास्या पिकला होता. मात्र खा. सुळे परत जाताना काही महिलांनी पाटील जाऊन दहा वर्षे झाली. निदान तुम्ही तरी रस्ता करून द्या असा खोचक प्रश्न मानल्याने लवकरच हा रस्ता होईल असे आश्वासन त्यांनी दिले.