12 वीच्या गणिताच्या पेपरसोबतच फिजिक्स आणि केमेस्ट्रीचेही पेपर फुटले होते, व्हॉट्सअपवर पाठवण्यात आल्या प्रश्नपत्रिका, मुंबई पोलिसांची धक्कादायक माहिती

या विषयांच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपवरुन पुढे पाठवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या प्रकरणात नगरच्या मातोश्री भागुबाई भांबरा एग्रीकल्चर आणि सायन्स ज्युनियर कॉलेजमधील काही कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असल्याचं मुंबी पोलिसांनी सांगितलंय.

मुंबई– गेल्या काही दिवसांपासून १२ वीच्या परीक्षेत गणिताचा पेपरफुटी प्रकरणावरुन (HSC Paper Leaked) अनेक ठिकाणी धाडी आणि अटकसत्र सुरु आहे. त्यात आता मुंबई पोलिसांनी (police) मोठा गौप्यस्फोट केला आहे. बारावीच्या गणितासोबतच फिजिक्स आणि केमेस्ट्री (physics and chemistry) हे दोन्हीही पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या विषयांच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपवरुन पुढे पाठवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. या प्रकरणात नगरच्या मातोश्री भागुबाई भांबरा एग्रीकल्चर आणि सायन्स ज्युनियर कॉलेजमधील काही कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असल्याचं मुंबी पोलिसांनी सांगितलंय. या क्रमचाऱ्यांचे मोबाईलही जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

नगरसह बुलढाणा आणि राज्याच्या इितर काही शहरात झालेल्या गणिताच्या पेपरफुटी प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँच तपास करीत आहे. या तपासात गणितासाह आणखी दोन विषयांचेही पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नगरमधून महाविद्यालयाचे मुख्याध्यापकांसह पाच जणांना अटक केल्याची माहिती आहे.

३ मार्चला गणिताचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली होती. परीक्षा सुरु होण्यापूर्वी ३ तास आधीच हा पेपर व्हॉट्सअपवरुन बाहेर आला होता. गणिताची प्रश्नपत्रिका ११९ मुलांना पाठवण्यात आली होती. त्या बदल्यात प्रत्येक मुलाकडून १० हजार रुपये घेण्यात आले होते. नगरच्या विद्यार्थअयांनाच हे पेपर देण्यात आले होते. कॉलेजचा निकाल १०० टक्के लागावा यासाठी हे करण्यात आलं होतं. परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे फोटो काढून ते व्हॉट्सअपवर पाठवण्यात आले होते.