फुटबॉलचा दिग्गज डेव्हिड बेकहॅमचं पहिल्यांदाच मुंबईत आगमन, अंबानी कुटुंबांकडून खास स्वागत!

पहिल्यांदाच भारतीय भूमीवर आलेले फुटबॉलपटू डेव्हिड बेहकम यांचे अंबानी कुटुंबाने जोरदार स्वागत केले. याआधी डेव्हिड बेकहॅमने भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सेमीफायनल सामन्याचाही आनंद लुटला आहे.

  इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम  (David Bekcham) सध्या भारतात आला आहे.  मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एकदिवसीय विश्वचषक उपांत्य सामना पाहण्यासाठी बेकहम भारतात आला आहे. यावेळी भारतांयाकडून या विदेशी पाहुण्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं.  भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी (Ambani House) डेव्हिड बेकहॅमचं खास स्वागत केलं  अंबानी कुटुंबाने बेकहॅमचे मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी अँटिलिया येथे त्याचं आदरातिथ्य केलं आणि त्यांना बेकहॅमचे नाव असलेली मुंबई इंडियन्सची जर्सी भेट दिली. अंबानी हाऊसमधील हे फोटो  सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.

  अंबानी कुटुंबाने डेव्हिड बेकहॅमचे केलं स्वागत

  मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सेमीफायनलचा सामना पाहिल्यानंतर डेव्हिड बेकहॅमने अंबानी कुटुंबाकडे हजेरी लावली. यावेळी मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी, मुलगी ईशा आणि मुलगा आकाश अंबानी यांच्यासह श्लोका मेहता आणि अनंत अंबानी, राधिका मर्चंट यांनी त्याचे जोरदार स्वागत केले. अंबानी कुटुंबाने बेकहॅमचे मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी अँटिलिया येथे आदरातिथ्य केले आणि त्यांना बेकहॅमचे नाव असलेली मुंबई इंडियन्स जर्सी भेट दिली.

  डेव्हिड बेकहॅमला १ नंबरची जर्सी भेट

  अंबानी कुटुंबाने फुटबॉलच्या दिग्गजांना 1 नंबरची बेकहॅम जर्सी भेट दिली आणि त्यासोबत एक फोटोही क्लिक केला. तत्पूर्वी, डेव्हिड बेकहॅमने विश्वचषक उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्धच्या जोरदार विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची भेट घेतली. युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड (युनिसेफ) चे सदिच्छा दूत डेव्हिड बेकहॅम यांनी सचिन तेंडुलकरसोबत स्टेडियमवर थरारक सामना पाहिला.

  या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. यादरम्यान आकाश अंबानी आणि डेव्हिड बेकहॅम यांनी वानखेडे स्टेडियमवर एकत्र सामना पाहिला. त्यांच्यासोबत अभिनेत्री कियारा अडवाणी, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रणबीर कपूर देखील उपस्थित होते. रोहित शर्माने त्याला त्याची भारताची जर्सी भेट दिली आणि त्याबदल्यात डेव्हिड बेकहॅमने रोहितला रिअल माद्रिदची जर्सी दिली. फुटबॉल लिजेंडने 2003 ते 2007 या कालावधीत स्पॅनिश फुटबॉल क्लब रिअल माद्रिदसाठी सामने खेळले.