amit shah nadda and vinod tawade

देशातील भाजपाच्या दृष्टीनं कमकुवत असलेल्या १६० लोकसभा मतदारसंघाकडं यावेळी विशेष लक्ष दिलं जाणार आहे. यात महाराष्ट्र, बिहार, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि ओरिसा या राज्यांचा समावेश आहे.

  नवी दिल्ली: गुजरातच्या निकालात (Gujrat Election 2022) मिळालेल्या यशानंतर आता भाजपा (BJP) पुढच्या विधानसभा निवडणुकांसोबतच लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागली आहे. देशातील भाजपाच्या दृष्टीनं कमकुवत असलेल्या १६० लोकसभा मतदारसंघाकडं यावेळी विशेष लक्ष दिलं जाणार आहे. यात महाराष्ट्र, बिहार, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि ओरिसा या राज्यांचा समावेश आहे. या १६० मतदारसंघांवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda), केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा(Amit Shah) आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं लक्ष असणार आहे.

  विनोद तावडे यांच्याकडे मोठी जबाबदारी
  या १६० मतदारसंघासाठी भाजपाच्या नेत्यांची आणि मंत्र्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) यांच्याकडे या समितीच्या प्रवर्तकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर महाराष्ट्राचे भाजपाचे प्रभारी सी. टी. रवी यांच्याकडे सहप्रवर्कपदाची जबाबदारी असेल. या समितीत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, स्मृती इराणी, किरण रिजिजू, अर्जुन राम मेघावाल, प्रल्हाद जोशी या मंत्र्यांचा समावेश असणार आहे.

  महाराष्ट्रावर शाह-नड्डांची नजर
  लोकसभा निवडणुकीत भाजपाची चांगली कामगिरी व्हावी यासाठी शाहा आणि नड्डा ही जोडी लक्ष ठेवून असणार आहे.  एकूण १६० पैकी निम्म्या मतदारसंघांची जबाबदारी ही जे. पी. नड्डा यांच्याकडे असेल तर उर्वरित मतदारसंघांवर अमित शाहांची नजर असणार आहे. राज्यात सत्तेत असलेलं शिंदे-फडमवीस सरकारच्या कामावर पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडमुकीत यश मिळवण्याची व्हूव्हरचना भाजपानं आखल्याचं दिसतंय. बूथवरील कार्यकर्त्यांची संख्या मजबूत करणं, केंद्र सरकारनं केलेली काम लोकांपर्यंत पोहचवणं आणि स्थानिक पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना बळ देणं;अशा तीन स्तरावर भाजपाचे संघटनात्मक प्रयत्न सुरु झाले आहेत.

  जे. पी. नड्डा तामिळनाडू, ओरिसा दौऱ्यावर
  याच १६० मतदारसंघांसाठी भाजपाचं नेतृत्व कामाला लागलेलं आहे. जे पी नड्डा हे दोन दिवसांच्या तामिळनाडू आणि ओरिसा दौऱ्यावर जाणार आहेत. या दोन्ही राज्यांत पक्षाला बळकटी देण्यासाठी ते प्रयत्न करतील.