Union Minister Amit Shah's Maharashtra tour suddenly postponed, what is the exact reason, read in detail

भारतीय जनता पक्षाची (BJP) प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मैदानात भाजपचे ‘चाणक्य’ अशी ओळख असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) मैदानात उतरणार आहेत. येत्या १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी ते पुणे दौऱ्यावर येणार आहेत.

    पुणे : भारतीय जनता पक्षाची (BJP) प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मैदानात भाजपचे ‘चाणक्य’ अशी ओळख असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) मैदानात उतरणार आहेत. येत्या १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी ते पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा पुणे दौरा महत्त्वपूर्ण ठरणार असून निवडणुकीसाठीच या दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची चर्चाही सुरू झाली आहे.

    शिवसृष्टीत आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार

    अमित शहा १८ आणि १९ फेब्रुवारीला पुण्यात आहेत. अमित शहा यांच्या हस्ते ‘मोदी ॲट ट्वेन्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. तर १९ फेब्रुवारी रोजी अमित शहा बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीत आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ‘मोदी ॲट ट्वेन्टी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी मोठा सार्वजनिक कार्यक्रम भाजपकडून आयोजित करण्यात येणार आहे.

    पोटनिवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची

    कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. या दोन्ही मतदारसंघातील निवडणुका बिनविरोध करण्याचे भाजप नेत्यांचे आवाहन महाविकास आघाडीने धुडकावत उमेदवार दिले आहेत. शिंदे-फडवणीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणेही बदलली आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला महाविकास आघाडीने मोठा धक्का दिला होता. त्यामुळे पोटनिवडणूक जिंकण्याचा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा दौरा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी पहिल्या टप्प्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या सरकारवाड्याचे लोकार्पण शहा यांच्या हस्ते होईल. सरकारवाडा या ठिकाणी कामकाजाचे ठिकाण, संशोधन ग्रंथालय, प्रदर्शन आणि बहुपयोगी सभागृह उभारण्यात आले आहे. शिवाय गड–किल्ल्यांची सफर, राज्याभिषेकाचा देखावा, महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका हे प्रसंग थ्री डी तंत्रज्ञान वापरून साकारण्यात आले आहेत.