राज्यातील राजकीय हालचालीना वेग, अमित शहा शिवसेना आमदारांची भेट घेण्याची शक्यता

राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह इतर बंडखोर आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत. अशातच भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) या सर्व आमदारांची भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच शिंदें गटानी सत्तास्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. मात्र, यात बाबींमध्ये पक्षांतरबंदी कायदा आडवा येऊ शकतो. त्यामुळे त्यातून कसा मार्ग काढायचा, याबाबत अमित शहांशी (Amit Shah) चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे.

    मुंबई : सोमवारी विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) पार पडली. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार (MLC Election 10 seat) रिंगणात उतरले होते. दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये (Congress and BJP) लढत रंगली होती. भाजपा व मविआ (BJP and MVA) या दोघांमध्ये अत्यंत चुरशीची लढाई झाली. अखेर रात्री निकाल (Election Result) हाती आल्यानंतर भाजपाचे पाचपैकी पाचही उमेदवार जिंकून आले आहेत. तर मविआचे सहापैकी पाच उमेदवार जिंकले असून, एक उमेदवार म्हणजे चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला. विधानपरिषद निवडणुकीत मविआच्या पराभवानंतर आता ठाकरे सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तसेच मविआमध्ये चलबिचलता तसेच सरकार अस्थिर होण्याची भीती व्यक्त केली जात असून, राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या १३ समर्थक आमदारांसह (13 MLA)  नॉट रिचेबल आहेत. शिंदे हे आपल्या गटातील आमदारांना घेऊन गुजरातमधील सुरत (Gujrat surat) आहेत. यामुळं महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. दरम्यान, या सर्व पाशर्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह इतर बंडखोर आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत. अशातच भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) या सर्व आमदारांची भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच शिंदें गटानी सत्तास्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. मात्र, यात बाबींमध्ये पक्षांतरबंदी कायदा आडवा येऊ शकतो. त्यामुळे त्यातून कसा मार्ग काढायचा, याबाबत अमित शहांशी (Amit Shah) चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे.

    सध्या राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे, दिल्लीत शरद पवार व देवेंद्र फडणवीस (Sharad Pawar and Devendra fadnvis in delhi) आहेत, तर शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सुद्धा बैठका (Shivsena, NCP and Congress) घेत आहे, तसेच शिवसेनेसह काँग्रेसमध्ये सुद्धा बंडाला उधाण आलं आहे. त्यामुळं मोठ्या संख्येनं एकनाथ शिंदेंबरोबर आमदार आहेत, हे आमदार जर भाजपाला मिळाले तर, मविआ सरकार धोक्यात येऊ शकते. म्हणून भाजपाकडून सुद्धा हालचाली सुरु आहेत. एकनाथ शिंदे व शिवसेना आमदार सध्या सुरत येथील मेरिडियन हॉटेलमध्ये आहेत. हे आमदार पुढील काही तासांत अहमदाबाद शहरात जातील आणि तिथे त्यांची अमित शहा यांच्यासोबत भेट होईल, अशी सुत्रांनी माहिती दिली आहे.