Video : अमित ठाकरेंनी घेतली खासदार उदयनराजेंची भेट; भेटीबाबत ठाकरे म्हणाले…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र आणि मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray meets Udayanraje Bhosale) यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली.

    सातारा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र आणि मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray meets Udayanraje Bhosale) यांनी खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांची भेट घेतली. अमित ठाकरे आज पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असून, त्यांनी पोवई नाक्यावरील शिवतीर्थ येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादनही केले.

    ही सदिच्छा भेट होती. यावेळी उदयनराजे यांनी अमित ठाकरे यांचं दिलखुलास स्वागत केलं. अमित हा माझ्या खास मित्राचा मुलगा आहे. अमित घरी आल्यावर मला माझा मुलगा घरी आल्यासारखं वाटलं, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. तसेच अमित हँडसम असला तरी हम भी कुछ कम नही, अशी मनमुराद फटकेबाजीही केली. त्यामुळे एकच खसखस पिकली.

    माझा मुलगा घरी आल्यासारखं वाटलं

    अमित ठाकरे साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. पक्ष बांधणीसाठी ते साताऱ्यात आले आहेत. यावेळी त्यांनी उदयनराजे यांची भेट घेतली. माझ्या खास मित्राचा मुलगा आला. माझा मुलगा घरी आल्यासारखं वाटलं, असं उदयनराजे म्हणाले.

    राजकारणात तरूणांनीही पुढे यावं

    केवळ अमितच नाही. बाकी इतर तरुणांनीही राजकारणात पुढे आलं पाहिजे. या तरुणांच्या हातून लोकांची सेवा झाली पाहिजे. ठाकरे घराण्याचा इतिहास मोठा आहे. प्रबोधनकार ठाकरे असतील, बाळासाहेब असतील. राज ठाकरे असतील. या सर्वांचा नावलौकिक त्यांनी केला पाहिजे. ती त्यांची जबाबदारी आहे. त्यांची फॅन फॉलोईंग जोरात आहे, असं ते त्यांनी सांगितलं.

    परफ्यूम भेट

    अमित ठाकरे यांना मी परफ्यूम दिलं आहे. बल्गारिचं आहे. मॅन असं या परफ्यूमचं नाव आहे. अमितला म्हटलं आता तू लहान मुलगा नाहीस. तू माणूस आहे. तू आता सर्वांची काळजी घेतली पाहिजे. यू नो लाँगर स्मॉल बॉय, यू आर मॅन.. असं उदयनराजे यांनी म्हणताच पुन्हा हशा पिकला.