आमोडे ग्रामपंचायत पुन्हा बिनविरोध; ४० वर्षांची परंपरा कायम : लोकनियुक्त सरपंचपदी सूर्यवंशी

आमोडे गावाची गेल्या ४० वर्षापासून ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध करण्याची परंपरा कायम राखण्यात गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि जेष्ठ नागरिकांनी बजावली.

    साक्री : विधानसभा मतदार संघातील आमोडे (Amode) या गावाची ४० वर्षांची परंपरा आजही कायम राखली आहे (40 Years Of Tradition Continues). या आठव्या पंचवार्षिक निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदी मंगलदास भिला सूर्यवंशी (Lok Niukta Sarpanch Mangaldas Bhila Suryavanshi) यांची बिनविरोध निवड करण्यात केली आहे.

    सदस्य म्हणून संजू ठुण्या चौरे, संदीप पोपट साबळे, प्रताप यशवंत सूर्यवंशी, अनिता वसंत गायकवाड, लक्ष्मी चुनिलाल गांगुर्डे, सिंधु सुरेश सुर्यवंशी, बकुबाई रामभाऊ साबळे यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व नवनिर्वाचित सरपंच, सदस्य यांचा सत्कार आमोडे गावी जाऊन आमदार मंजुळा गावित यांनी केला.

    आमोडे गावाची गेल्या ४० वर्षापासून ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध करण्याची परंपरा कायम राखण्यात गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि जेष्ठ नागरिकांनी बजावली. त्यांचा देखील सत्कार आ. मंजुळाताई गावित यांच्या हस्ते करण्यात आला.

    याप्रसंगी जि.प. सदस्य रमाकांत अहिरराव, पोलिस पाटील, योगेश साबळे, परिसरातील सरपंच सुहास सूर्यवंशी, राणीलाल गांगुर्डे, रामभाऊ साबळे, चमुलाल सुर्यवंशी, पितांबर गवळी, योगेश सूर्यवंशी, धवळी विहीरचे सरपंच धनराज जगताप, प्रदीप भोये, उपसरपंच अशोक ठाकरे, लक्ष्मण सूर्यवंशी, गुलाब बहिरम, सुरेश सुर्यवंशी, नवल चौरे, गुलाब साबळे, लिलाधर सुर्यवंशी, वसंत गायकवाड, प्रकाश जगताप, वसंत सुर्यवंशी, शिवदास साबळे, भास्कर सूर्यवंशी, मनोज ठाकरे, उगलाल सूर्यवंशी, बाला गवळी, रवींद्र सूर्यवंशी, दीपक साबळे, दिनेश सूर्यवंशी, संदीप ठाकरे, भगवान सूर्यवंशी, युवराज सूर्यवंशी, महेद्र ठाकरे, लाला सूर्यवंशी, आकाश साबळे, विलास सूर्यवंशी, नितिन गांगुर्डे, युवराज सूर्यवंशी, रमेश पवार, तसेच गावातील तरुण युवक मंडळी उपस्थित होते. आमोडे गावात येऊन नवनिर्वाचित सदस्यांचा व जेष्ठ नागरीकांचा सत्कार केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आमदार मंजुळा गावीत यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.