अमोेल कोल्हे यांची अभिनयातून निवृत्ती! राजकारणासाठी सिनेजगताला ठोकला रामराम

महाविकास आघाडीचे शिरुरचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कलाकार म्हणून चिडवणाऱ्या लोकांना अमोल कोल्हे यांनी मोठा धक्का दिला आहे.

    पुणे : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये जोरदार प्रचार सुरु आहे. चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा जोर वाढला असून राजकारणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचे सत्र रंगले आहे. दरम्यान शिरुर लोकसभा मतदारसंघाची लझत अजित पवार गट व शरद पवार गट यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. महाविकास आघाडीचे शिरुरचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कलाकार म्हणून चिडवणाऱ्या लोकांना अमोल कोल्हे यांनी मोठा धक्का दिला आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि शिरुरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले आहेत. तसेच, इतर चित्रपट व मालिकांमधूनही ते प्रेक्षकांचे चाहते अभिनेत आहेत. मात्र, राजकारणात आल्यानंतर त्यांना अभिनेते म्हणून हिणवले जात आहे. अभिनेत्याला लोकसभा मतदारसंघाचे किंवा जनतेचे प्रश्न काय समजणार, असे म्हणत अजित पवार व पाटील यांच्याकडून लक्ष्य केलं जात आहे. मात्र, आता अमोल कोल्हेंनी या सर्व टीकाकारांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला आहे.

    5 वर्षांसाठी अभिनयातून ब्रेक

    खासदार कोल्हे यांनी आगामी 5 वर्षांसाठी मोठा निर्णय जाहीर केला. राजकारण हा पार्टटाईम व्यवसाय नसून फुल टाईम सेवा करण्याचं क्षेत्र असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलं. माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील प्रश्न सोडवायचे असतील तर, मी मला पूर्णवेळ काम करावे लागणार आहे. मी जे पाहिलेलं आहे, मला वाटतं अभिनय क्षेत्राला ब्रेक जरी घेतला तरी आत्ता शिरुर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडवणे यालाच माझं प्राधान्य आहे. त्यामुळे, अभिनय क्षेत्रासाठी ब्रेक घ्यावा लागला तरी माझी काहीच हरकत नाही. काही दिवसांसाठी नाही, तर 5 वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेईल. माझी शिरुरच्या जनतेसाठी ही कमिटमेंट आहे, असे म्हणत अमोल कोल्हें यांनी पुन्हा खासदार झाल्यास आपण 5 वर्षांसाठी अभिनय श्रेत्राला रामराम करत असल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले. छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे एवढाच अपवाद राहिले, त्यामुळे या व्यतिरिक्त मी तुम्हाला स्क्रीनवर दिसणार नाही, अशा शब्दात अमोल कोल्हेंनी पुढील 5 वर्षांसाठीची भूमिका जाहीर केली.