
भाजपने छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची व अपमानाची सुपारी घेतली आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी शिवरायांवर केलेल्या वादग्रस्त विधानावरून वातावरण पेटललं असतानाच आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी या वातावरणात आणखी भर टाकली आहे. “शिवरायांचा जन्म कोकणात झाला”, असं वक्तव्य भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलं आहे. यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी?
भाजपकडून वांरवांर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधानं करण्यात येत आहे. आता कोकणात एका कार्यक्रमात आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांबद्दल विधान केलं आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला व त्यांचे बालपण रायगडावर गेले” असं त्यांनी म्हण्टलं आहे. यावर अमोल मिटकरीं यांनी त्यांच्यावर टिका केली आहे. भाजपने छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची व अपमानाची सुपारी घेतली आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
भाजपचे आमदार श्री प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवात आज नवीन इतिहास मांडला. “छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला व त्यांचे बालपण रायगडावर गेले” .परत एकदा इतिहासाशी छेडछाड झाली आहे. भाजपनी छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची व अपमानाची सुपारी घेतली आहे का?
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 4, 2022
प्रसाद लाडांच्या अभ्यासात भर पडावी याकरिता चौथीच्या इतिहासाचे हे पुस्तक त्यांना माझ्याकडून पाठवीत आहे . pic.twitter.com/F4yyr5Sov4
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 4, 2022
प्रसाद लाड यांनी शिवरायांबद्दल काय वक्तव्य केलं?
“हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. रायगडावर शिवरायांचं बालपण गेलं आणि याच रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली” असं प्रसाद लाड म्हणालेत.