महाराष्ट्राला राज्यपालांची मोठी परंपरा लाभली आहे, मात्र तुम्ही घटनाबाह्य वागलात असं घटनातज्ज्ञांचे मत, अमोल मिटकरींचे कोश्यारींना खरमरीत पत्र

आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्यपालांना (Governot) एक खरमरीत पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी राज्यपालांना अनेक टोले लगावले आहेत. आपल्या देशातील लोकशाही, समता, स्वातंत्र्य व बंधुता ही मूल्य संविधानात आहेत. पी. सी. अलेक्झांडर हे लोकांचे राज्यपाल म्हणून महाराष्ट्राच्या जनतेस आजही स्मरणात आहेत. आपण शिवप्रेमी आहात. संविधान प्रेमी असाल, याबाबत मी तरी आशावाद आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपण अनेकदा घटनाबाह्यच वागलात, असे मत विविध घटनातज्ज्ञांनी व्यक्त केले. असं पत्रात म्हणत मिटकरींनी राज्यपाल मविआ सरकारच्या काळात कसे वागले याचा पाढा वाचला आहे.

    अकोला : मागील आठवड्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर दोन दिवसीय विशेष अधिवेशन (Special Adhiveshan) बोलावण्यात आलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या (Speaker of the Assembly) निवडीनंतर सोमवारी शिंदे-फडणवीस (Shinde-fadnvis government) सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. राज्यात सत्तांतर झाले आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला. या सर्व घडामोडींनंतर आता आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरु झाले आहे.

    दरम्यान, आज आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्यपालांना (Governor) एक खरमरीत पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी राज्यपालांना अनेक टोले लगावले आहेत. आपल्या देशातील लोकशाही, समता, स्वातंत्र्य व बंधुता ही मूल्य संविधानात आहेत. पी. सी. अलेक्झांडर हे लोकांचे राज्यपाल म्हणून महाराष्ट्राच्या जनतेस आजही स्मरणात आहेत. आपण शिवप्रेमी आहात. संविधान प्रेमी असाल, याबाबत मी तरी आशावाद आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपण अनेकदा घटनाबाह्यच वागलात, असे मत विविध घटनातज्ज्ञांनी व्यक्त केले. असं पत्रात म्हणत मिटकरींनी राज्यपाल मविआ सरकारच्या काळात कसे वागले याचा पाढा वाचला आहे.

    तसेच पत्रातून टोमणे लगावले आहेत. पुढे मिटकरींनी पत्रात म्हटलंय की, मविआने राज्यपालांना दिलेल्या १२ आमदारांची यादी लांबवली होती, मात्र नवीन सरकार येताच यावर राज्यपालांनी हालचाली सुरु केल्या आहेत. घाईघाईत केलेली फ्लोअर टेस्ट, राजकारण्यांना भरवलेले पेढे या आपल्या सर्व भूमिका वारंवार संशयाच्या भोवऱ्यात येत होती. तरीही आपण संविधानाचा सन्मान करत असाल, याबाबत मला शंका नाही, असे मिटकरी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळं मिटकरी यांच्या या पत्राची जोरदार चर्चा सुरु असून, राज्यपाल याला काय उत्तर देतात हे पाहावे लागेल.