राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीत साहिल लाड यांची बैलगाडी प्रथम क्रमांकाने विजयी

जिल्हास्तरीय बैलगाडी शर्यतीत हळवल येथील अमोल ठाकूर यांच्या बैलगाडी प्रथम, दामू सावंत मित्र मंडळ जाणवली आयोजित कार्यक्रम

    कणकवली जाणवली येथे हजारो प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी बैलगाडी शर्यत पार पडली. जाणवली येथील दामू सावंत मित्र मंडळ आयोजित या राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीत साहिल सुनील लाड यांची बैलगाडी १ मिनिट ५ सेकंद ६५ पॉईंट ही वेळ गाठून प्रथम क्रमांकाने विजयी झाली. तर स्वराज गुरव आरवली यांच्या गाडीने दुसरा क्रमांक मिळवला. नितीन मधुकर देसाई आणि गुरुनाथ वैभव साटेलकर यांच्या गाडीने अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक मिळविला. तर जिल्हास्तरीय बैलगाडी शर्यतीत हळवल येथील अमोल ठाकूर यांच्या बैलगाडी १ मिनिट १० सेकंद ९ पॉईंट ही वेळ गाठून प्रथम क्रमांक मिळविला. कुडाळ येथील चंद्रकांत नारायण वाटवे यांच्या बैलगाडीने दुसरा तर नारायण शिरसाट व कणकवली येथील सुरेश सावंत यांच्या गाडीने अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक पटकाविला. या विजेत्या बैलगाड्यांना आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व सन्मानाची ढाल देऊन गौरविण्यात आले.

    यावेळी दामू सावंत मित्रमंडळाचे संस्थापक दामू सावंत, भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, मालवण तालुका अध्यक्ष राजा गावकर, सामाजिक कार्यकर्ते संदिप सावंत, भालचंद्र साटम, सरपंच अजित पवार उपसरपंच किशोर राणे, माजी सभापती रंजन राणे, पोलीस पाटील मोहन सावंत, दत्तात्रय सावंत, मारुती सावंत आप्पा परब श्री सामंत, मकरंद सावंत, शुभम कासले, ओंकार सावंत, माजी सरपंच शारदा राणे, संजना कारेकर राजश्री राणे प्राजक्ता राणे, शुभधा राणे, सत्यवान राणे, अनिल राणे, उदय राणे, वेदांत सोहनी, प्रतीक सावंत, दिपक दळवी, कुशल राणे, सुशील सावंत, पार्थ सावंत, दर्शन सावंत, संदेश राणे, बाबू राणे, बंड्या राणे, ताता राणे, स्वप्नील पेडणेकर, अशोक राणे, आशिष राणे, हर्षद उंबरकर, ओंकार पांगे, सत्यवान राणे सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील बाबू आचरेकर संतोष कारेकर व गावातील आजी-माजी सर्व पदाधिकारी सरपंच चेअरमन विनय राणे व गावातील सर्व बारा, पाच बारा पाच मानकरी आदी सह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंच म्हणून विशाल मिस्त्री यांनी काम पाहिले तर लालू दळवी यांनी सूत्रसंचालन केले.

    दामू सावंत मित्रमंडळाचे काम कौतुकास्पद – आमदार नितेश राणे
    दामू सावंत मित्रमंडळाचे जाणवली पंचक्रोशीत सुरू असलेले काम कौतुकास्पद आहे. बैल हा शेतकऱ्याचा प्रिय प्राणी आहे त्याच्या प्रति असलेली प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी आणि बैला प्रति शेतकऱ्याचा असलेला स्वाभिमान जागृत करण्यासाठी दामू सावंत यांनी ही स्पर्धा घेतली. अशा स्पर्धा घेण्यासाठी यापुढे जे सहकार्य लागेल ते दामू सावंत मित्रमंडळाला आम्ही सातत्याने करू, अशा पद्धतीचा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. दामू सावंत आणि त्यांच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन यावेळी त्यांनी केले.