भाजप समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे – रोहित पवार

लोकसभेच्या आधी हिंदू मुस्लिम होत नाही. म्हणून समजा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपा कडून केला जातो. सामान्य लोकांचे मुख्य मुद्दे बाजूला राहतात.

    अमरावती : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही व आमचे मित्र पक्ष रस्त्यावर उतरतील, शेतकऱ्यांचे उत्पादन कमी झालं. मात्र, खर्च वाढला. उसाला जास्त दर मिळाला पाहिजे. मात्र, कोणतीही संस्था अडचणीत येऊ नये, ही चर्चा होत असताना एकत्रितपणे आपण मार्ग शोधू शकतो. जो पवारांचा दाखला सोशल मीडियावर बाहेर फिरत आहे तो खरा नाही. पण भाजपा नेहमीच खोट्या गोष्टी पसरत असते. त्यांचं राजकारण करते. त्यांना असत्याचा मार्ग घेऊन सत्तेत येणे एवढच कळतं, व सत्तेत आल्यावर त्यांना पॉवरचा उतमाद करणं एवढंच त्यांना कळत. सामान्य लोकांचे प्रश्न कळत नाही.

    लोकसभेच्या आधी हिंदू मुस्लिम होत नाही. म्हणून समजा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपा कडून केला जातो. सामान्य लोकांचे मुख्य मुद्दे बाजूला राहतात. लक्ष दुसरीकडेच घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो. आणि देवेंद्र फडणवीस सर्व रणनीतीच्या मागे आहेत. मराठा आणि ओबीसी सोबतच हिंदू, मुस्लिम होण्याचा प्रयत्न केला जाईल. समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपकडून केला जातो. अजित पवार व शरद पवार परत येतील की नाही? तो त्यांचा दोघांचा प्रश्न आहे. मात्र, अजित पवारांच्या चेहऱ्याकडे पाहून ते नाराज आहेत, असं जाणवत आहे.

    भाजपला लोकनेता पटत नाही. त्यांना त्यांच्या पक्षातला लोकनेता सुद्धा पटत नाही, लोकनेत्याची ताकद भाजप कमी करते आणि तीच गोष्ट अजित पवार यांच्या सोबत होत आहे. गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांची ताकद भाजपने कमी केली आहे.