अमरावती पदवीधर मतदारसंघाची दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरू! 2382 मतांनी मविआचे धीरज लिगांडे आघाडीवर

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी ३० जानेवारीला १,०२,४०३ मतदान झाले आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षाचे चार व अपक्ष १९ असे एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत.

    अमरावती :  राज्यातील पाच पदवीधर-शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीच्या ( teachers graduate constituency election ) मतमोजणीला कालपासून सुरूवात झाली आहे. नागपूर, कोकण आणि औरंगाबादच्या निवडणुकीचे निकाल लागले असून अमरावती पदवीधर मतदारसंघाची दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरू आहे. अमरावती पदवीधर (amravati) मतदारसंघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आणि भाजपचे रणजित पाटील यांच्यात लढत आहे. 2382 मतांनी मविआचे धीरज लिगांडे आघाडीवर असून त्यांना 83697 तर भाजपचे रणजीत पाटील यांना 41315 मते मिळाली आहे.

    अमरावतीमध्ये चुरस

    अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक मतमोजणी सुरु आहे. काल एकूण 28 पैकी 18 टेबलांवरील मतमोजणीत लिंगाडे आघाडीवर होते. सध्या पसंती क्रमांक दोनची मोजणी सुरू आहे. त्यामुळे या मतमोजणीत कुणाचा विजय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  दरम्यान सध्या २३८२ मतांनी मविआचे धीरज लिगांडे आघाडीवर आहेत. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत १४ वे उमेदवार श्याम प्रजापती बाद झाले आहेत. अजूनही विजयाचा कोटा ४७हजार१०१ पूर्ण झाला नाही. विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी धीरज लिगांडे यांना ३४०४ मतांची आवश्यक आहे. येथील २३पैकी अजुनही ८ उमेदवारांच्या दुसऱ्या पसंतीची मते मोजण्याची प्रक्रिया सुरू आहे.

    रणजित पाटलांनी फेर मतमोजणीची केली मागणी

    रणजित पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. तब्बल 8 हजार अवैध मते आढळून आल्याने पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. अवैध मते बाद झाल्यास आपला विजय होईल, असा पाटील यांचा कयास होता. अवैध मते धीरज लिंगाडे यांना पडल्याचा पाटील यांचा अंदाज होता. पण त्यांचा हा अंदाज फोल ठरला आहे. 8 हजार अवैध मतांपैकी धीरज लिंगाडे यांना केवळ 32 मते मिळाली होती. लिंगाडे यांची ही 32 अवैध मते बाद ठरली आहेत.

    अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी ३० जानेवारीला १,०२,४०३ मतदान झाले आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षाचे चार व अपक्ष १९ असे एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत. गुरुवारी येथील नेमाणी गोडावूनमध्ये मतमोजणीला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून धीरज लिंगाडे व रणजित पाटील यांच्यात चुरस होती. मात्र, प्रत्येक फेरीमध्ये लिंगाडे यांनी आघाडी घेतली आहे.