मुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यात अमृत २.० योजनेच्या तीन तेरा, ठेकदार फरार..?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडी नगरपंचायत येथे अमृत २.० योजनेचे काम अर्धवट टाकून ठेकेदार पसार झाला असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. यामुळे शाळेत जाणारी मुले तसेच नागरिकांना २ किलोमीटर पाय पिट करत चालत जावे लागत आहे.

    म्हसवड : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडी नगरपंचायत येथे अमृत २.० योजनेचे काम अर्धवट टाकून ठेकेदार पसार झाला असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. यामुळे शाळेत जाणारी मुले तसेच नागरिकांना २ किलोमीटर पाय पिट करत चालत जावे लागत आहे.
    अमृत २.० योजनेचा काम काही दिवसापूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र पाईप लाईन जोडणीसाठी चारी काढून माती रस्त्यावरती टाकण्यात आल्याने शहराचे मुख्य रस्ते जोडणाऱ्या खेड्यातील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. खड्डे, चिखल यामुळे प्रवास करणे अवघड झाले आहे. यावरती नागरिकांन मध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून तत्काळ ठेकदाराला दंड करुन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
    यासंदर्भात स्थानिक नगरसेवक महेश जाधव यांनी  पुणे विभागीय आयुक्त, सातारा जिल्हाधिकारी यांना पत्र व्यवहार केला आहे, मात्र तरी देखील ठेकदार एस.व्ही जाधव तसेच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यश इनोव्हेटिव्ह हे दखल घेत नसल्याचे सांगत आहेत.
    हा प्रकल्प १८ महिन्यात पूर्ण करायचा आहे. मात्र हे काम धीम्या गतीने सुरू होते ते देखील बंद करण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची व नगरपंचायतची  फसवणुक करुन अनेक अटीशर्तीचे उल्लघन करत स्वतःचा फायदा करण्यावरती ह्या खाजगी कंपनीचा डोळा असल्याचे नागरिक बोलत आहेत.

    पाईपलाईन कामासाठी रस्ता खोदला असल्याने पावसाळ्यात रस्त्यावर पाणी चिखल जमा होत आहे. यामुळे प्रवास करणे अवघड झाले असून गाडी स्लिप होणे अपघात होने आता नित्याचे झाले आहे. या प्रश्नाकडे जिल्हाधिकारी तुमच्याकडून होत नसेल तर विभागीय आयुक्तांनी लक्ष द्यावे आणि मुख्यमंत्री यांच्या जिल्ह्याची लखतरे राज्यभर निघणार नाहीत याकडे तातडीने लक्ष द्यावे.

    - राजू मुळीक (स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष)