कस्तुरबा रुग्णालयात आढळला बेवारस मृतदेह

भवानी पेठेतील कस्तुरबा रुग्णालय परिसरातील एका पडक्या इमारतीत ३० ते ३५ वयोगटातील पुरुष जातीचा बेवारस मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाच्या अंगात पोपटी रंगाचे जर्किन व काळा शर्ट दिसून येत आहे. त्याचे तोंड व पाय पूर्णपणे सडलेल्या अवस्थेमध्ये होते.

    सातारा : भवानी पेठेतील कस्तुरबा रुग्णालय परिसरातील एका पडक्या इमारतीत ३० ते ३५ वयोगटातील पुरुष जातीचा बेवारस मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाच्या अंगात पोपटी रंगाचे जर्किन व काळा शर्ट दिसून येत आहे. त्याचे तोंड व पाय पूर्णपणे सडलेल्या अवस्थेमध्ये होते. हा प्रकार २२ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता उघडकीस आला याप्रकरणी कोमल नामदेव पवार यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येथे नागरिकांना तीव्र स्वरूपाची दुर्गंधी जाणवू लागल्याने त्यांनी शाहूपुरी पोलिसांना याची कल्पना दिली होती. रुग्णालयाच्या पडक्या इमारतीत पोलिसांनी पाहणी केली असता तेथे हा मृतदेह आढळून आला आहे. मात्र इतक्या गर्दीच्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या इमारतींमध्ये असे बेवारस मृतदेह आढळून कसे येतात असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे आता हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.