सहलीसाठी गेलेल्या चेंबूर येथील खासगी बसला अपघात; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

चेंबूर येथील मयांक ट्युटोरिअल्स या खाजगी क्लासच्या विद्यार्थ्यांची सहल मावळ येथील वेट अँड जॉय या थीमपार्कला गेली होती. रविवारी रात्री आठच्या सुमारास मुंबईकडे परतत असताना बोरघाटातील मॅजिक पॉईंटजवळ या खाजगी बसला अपघात होऊन पलटी झाली.

    खोपोली : मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर (Mumbai-Pune Expressway) बोरघाटात खाजगी आराम बस (Bus Accident) पलटी झाल्याची घटना काल संध्याकाळी घडली. या अपघातात एक विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. तसेच, ३५ विद्यार्थी जखमी असल्याची माहिती असून त्यांच्यावर खोपोलीतील (Khopoli) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हितिका खन्ना आणि राज म्हात्रे अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.

    चेंबूर येथील मयांक ट्युटोरिअल्स (Mayank Tutorials) या खाजगी क्लासच्या विद्यार्थ्यांची सहल (Student Tour) मावळ येथील वेट अँड जॉय (Wait And Joy) या थीमपार्कला गेली होती. रविवारी रात्री आठच्या सुमारास मुंबईकडे परतत असताना बोरघाटातील मॅजिक पॉईंटजवळ या खाजगी बसला अपघात होऊन पलटी झाली. या अपघातात त्यामधील सर्वच विद्यार्थी जखमी झाले. त्यामधील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तसेच, या घटनेत ३५ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.

    अपघातातील सर्व विद्यार्थ्यांवर खोपोलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लोणावळा येथून मुंबईच्या दिशेने निघालेल्या खासगी बसचा हा अपघात झाला आहे. खाजगी क्लासेसच्या ४८ विद्यार्थ्यांना घेऊन ही बस सहलीसाठी गेली होती.