केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारकांची फौज – प्रमोद जठार

सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाला ऐतिहासिक परंपरा आहे. या मतदारसंघात माहितीचे उमेदवार म्हणून नारायण आणि निवडणूक लढवत आहे. त्यामुळे गेल्या १० वर्षात अपयशी ठरलेल्या विनायक राऊत यांचा पराभव निश्चित आहे.

    सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाला ऐतिहासिक परंपरा आहे. या मतदारसंघात माहितीचे उमेदवार म्हणून नारायण आणि निवडणूक लढवत आहे. त्यामुळे गेल्या १० वर्षात अपयशी ठरलेल्या विनायक राऊत यांचा पराभव निश्चित आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदिनाथ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जाहीर सभा होणार आहेत.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारकांची फौज असल्याची माहिती भाजपा लोकसभा प्रमुख,माजी आ. प्रमोद जठार यांनी दिली.

    कणकवली येथील नारायण राणे संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

    २६ एप्रिल दुपारी १ वाजता राजापूर राजीव गांधी पटांगणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नारायण राणे यांच्या प्रचाराची सभा होणार आहे.दुपारी १२ वाजता ही सभा होणार आहे,बुधवार १ मे रोजी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे. ३ मे रोजी गृहमंत्री अमित शहा यांची रत्नागिरी येथे जाहीर प्रचार सभा होणार आहे,असे प्रमोद जठार यांनी सांगितले.

    नारायण राणे यांच्या विजयाचा चंग महायुती कार्यकर्त्यांनी बांधला आहे.राणेंच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघाची ताकद वाढली आहे.पूर्वीचा राजापूर लोकसभा आणि आताचा रत्नागिरी मतदारसंघाला नाथ पै ,मधू दंडवते, सुरेश प्रभू यांच्या यांनी नेतृत्व केलं. आता या ठिकाणी नारायण राणे हे कमळ या निशाणी लढत आहेत,त्यांना मतदारांनी मतदान करावे,केंद्रातील ५० लाख कोटी बजेट मधील वाटा कोकणला मिळेल.आपल्या भागाचा विकास करुयात.देशांमध्ये या मतदारसंघाने उंची गाठली ,ती पुन्हा राऊत निवडून आल्यास जिल्हा पातळीवर येईल.या भागाला आवश्यक असलेला रोजगार दिला जाईल,असे श्री .जठार यांनी सांगितले.

    रत्नागिरी तिन्ही विधानसभा मध्ये ३ – ३ वर्षे आम्ही काम करीत आहोत.सिंधुदुर्गातील ४ लाख आणि रत्नागिरी मध्ये ३.५ लाख मतदान होईल.खासदारांनी गेल्या १० वर्षात दाखवण्यासारखी काम केलं नाही.विनायक राऊत हे अपयशी ठरले आहेत.सगळया बाबतीत मोदींनी काम केलं आहे.तर खा.राऊत यांनी शून्य कामगिरी केली.१३ तालुक्यात १५०० कोटी आलेत,पाण्यासाठी आले ते पैसे खर्च करण्यासाठी काम करु शकले नाही.हायवे रखडलेल्या कामांमध्ये अडीअडचणी मध्ये राऊत काम करताना दिसत नाही.चिपळूण आणि लाज्यांचा प्रश्न आम्ही मार्गी लावला.३ लाख कोटींचा रिफायनरी प्रकल्प आणून २ लाख रोजगार मिळणार होता.रोजगार मिळाला असता तर बंद घरे उघडली असती.विकासाचे व्हिजन विनायक राऊत यांना नाही.पुढून विरोध करायचा आणि मागून सेटलमेंट करायची.खंबाटा प्रकरणात मराठी लोकांना रस्त्यावर विनायक राऊत यांनी आणले,असल्याचा आरोप प्रमोद जठार यांनी केला.