
किरकोळ कारणावरून झालेल्या जुन्या वादातून एका तरुणावर टोळक्याने (Attack on Youth) धारधार हत्याराने सपासप वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. नऱ्हेत मध्यरात्री हा प्रकार घडला असून, पोलिसांनी दोन सराईतांसह सात जणांना (Pune Crime) अटक केली आहे.
पुणे : किरकोळ कारणावरून झालेल्या जुन्या वादातून एका तरुणावर टोळक्याने (Attack on Youth) धारधार हत्याराने सपासप वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. नऱ्हेत मध्यरात्री हा प्रकार घडला असून, पोलिसांनी दोन सराईतांसह सात जणांना (Pune Crime) अटक केली आहे.
अनिकेत शिवाजी शेंडकर (वय २२), अक्षय घोडके (वय २७), संग्राम कुटे (वय २६), यश बाळु म्हसवडे (वय २०), समर्थ प्रकाश गुरव (वय २२), प्रविण अनंता येनपुरे (वय २८) व गणेश जाधव (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, यातील एक अल्पवयीनासह दोघे फरार आहेत. याघटनेत निरज भडावळे (वय २१) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण आणि फरार असणारा विशाल हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. निरज व आरोपी यांच्यात जुने वाद आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले होते. या रागातून टोळक्याने बुधवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास निरज याच्यावर हल्ला केला. त्याला खाली पाडून टोळक्याने लाथाबुक्यांनी मारहाण केली.
एकाने लोखंडी धारधार हत्याराने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पसार झालेल्या या टोळक्यातील सात जणांना पोलिसांनी डोंगराच्या परिसरात तसेच रानातून पाठलाग करून पकडले. पुढील तपास पोलीस करत आहेत.