An attractive work of art carved on ancient trees by raising public awareness through pictures

अचलपूर नगर परिषद यांच्या संकल्पनेतून माझी वसुंधरा अभियानातंर्गत परतवाडा ते अमरावती मार्गावरील चांदूर बाजार नाक्यापर्यंत पुरातनकालीन झाडांवर चित्रकलेच्या माध्यमातून झाडे सुशोभीकरणाचे काम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सुशोभीकरणच नाही तर या उपक्रमामुळे पुरातन झाडांचे जतन होवून जनजागृती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.

    अचलपूर : झाडांचे महत्व सर्वांना पटावे यासाठी अचलपूर नगरपरिषदेने (Achalpur Municipal Council) एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. परतवाडा ते अमरावती (paratwada  to Amravati) मार्गावरील पुरातन वृक्षांवर रंगरंगोटी करून वृक्ष बोलके करत या माध्यमातून वृक्ष संगोपनासह पर्यावरण संरक्षणाची जनजागृती (Public awareness of environmental protection) करण्याचा प्रयत्न केला आहे. या अनोख्या उपक्रमामुळे झाडांचे संवर्धन झाले असून शहरातील सौंदर्यात देखील भर पडली आहे.

    अचलपूर नगर परिषद यांच्या संकल्पनेतून माझी वसुंधरा अभियानातंर्गत परतवाडा ते अमरावती मार्गावरील चांदूर बाजार नाक्यापर्यंत पुरातनकालीन झाडांवर चित्रकलेच्या माध्यमातून झाडे सुशोभीकरणाचे काम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सुशोभीकरणच नाही तर या उपक्रमामुळे पुरातन झाडांचे जतन होवून जनजागृती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. त्यामुळे आता या मार्गावरील झाडे बोलकी झाली आहेत. या मार्गावरील रस्त्यावर सौंदर्याची झलक अनुभवायला मिळण्यासाठी झाडांवर प्राणी, पक्षी यांची चित्रे काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे.

    दोनशेच्यावर झाडे लागली बोलू

    यामध्ये परतवाडा ते चांदुर बाजार नाक्यापर्यंत जवळपास दोनशेच्यावर झाडांवर चित्रे (Paintings on over two hundred trees) काढण्यात आली आहे. या चित्रांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडत असून जनजागृती सुद्धा होत आहे. सोबतच नगरपालिकेकडून शहर स्वच्छतेबरोबरच सुंदर दिसण्याकडे जास्त भर दिला आहे. गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी शहरातील झाडांवर चित्र काढण्याचे काम केले आहे. शहरातील या अनोख्या उपक्रमामुळे या मार्गावरील झाडांचे संवर्धन झाले असून शहरातील सौंदर्यात देखील भर पडली आहे. त्यामुळे, शहरातील रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे आता बोलू लागली आहेत.