वडगावात विद्युत खांबाला आग; परिसरामध्ये भीतीचे वातावरण

वडगाव नगरपंचायत हद्दीतील सिद्धिविनायक मित्र मंडळ चौकाजळील एका विद्युत खांबाला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली.

    वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायत (Vadgaon Nagar Panchayat) हद्दीतील सिद्धिविनायक मित्र मंडळ चौकाजळील एका विद्युत खांबाला आज (दि.14) रोजी दुपारच्या सुमारास अचानक आग (Fire Case) लागली. तसेच वीज पुरवठा खंडीत झाला. या घटनेमुळे परिसरात एकच घबराट निर्माण झाली.

    यावेळी स्थानिकांनी यांनी घटनेची माहिती तातडीने नगरपंचायत अग्निशमन विभाग आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिली. यामुळे काही वेळातच तेथे अग्निशमन विभागाचे कर्मचारी समीर दंडेल जवान आणि महावितरणचे कर्मचारी पोहचले. आणि काही वेळातच आग आटोक्यात आणून विद्युत व्यवस्था सुरळीत केली.

    यावेळी माजी नगरसेवक शाम ढोरे यशवंत शिंदे गणेश लांघे,सौरभ ढोरे संदीप तुमकर तसेच नगरपंचायत कर्मचारी, महावितरण आणि स्थानिकांनी सहकार्य केले.