former secretary of housing society fined rs 3 lakh high court decision read in detail nrvb

याचिकाकर्त्याला फाशीची शिक्षा का ठोठावण्यात आली ? हत्या इतकी क्रूर होती का ? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. त्यावर याचिकाकर्त्याने मद्यधुंद अवस्थेत आईची हत्या करून तिचे अवयव काढून टेबलवर ठेवले होते, अशी माहिती कुचकोरवीलाच्या वतीने वकील युग चौधरी यांनी न्यायालयाला दिली. आईच्या हत्येमागचा त्याचा हेतू अस्पष्ट आहे.

मयुर फडके, मुंबई : आपल्याच आईच्या हत्येप्रकरणी (Mother Murder Case) फाशीची शिक्षा (Death Sentence) झालेल्या दोषसिद्ध झालेल्या आरोपीला (Accused) स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी (Daughter Wedding) उपस्थित राहण्याची मुभा (Exemption) सोमवारी उच्च न्यायालयाने (High Court) दिली. फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींना तात्पुरता जामीन (Provisional Bail), पॅरोल (Parole) किंवा फर्लोसारख्या सवलतींचा अधिकार नाही. परंतु या प्रकरणात दोषसिद्ध आरोपीला मुलीच्या लग्नाला उपस्थित राहण्याची न्यायालयाने परवानगी दिल्यामुळे हे एक दुर्मिळ प्रकरणच (Rare Case) म्हणावे लागेल.

सुनील कुचकोरवीला कोल्हापूर सत्र न्यायालयाने २०२१ मध्ये आईच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करणारी राज्य सरकारची याचिका उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यातच आपल्या मुलीच्या लग्नासाठी एक आठवड्याचा तात्पुरत्या जामीन देण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज कुचकोरवीलाने उच्च न्यायालयात केला होता. त्यावर सोमवारी न्या. अजय गडकरी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्यासमोर सुनावणी झाली.

याचिकाकर्त्याला फाशीची शिक्षा का ठोठावण्यात आली ? हत्या इतकी क्रूर होती का ? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. त्यावर याचिकाकर्त्याने मद्यधुंद अवस्थेत आईची हत्या करून तिचे अवयव काढून टेबलवर ठेवले होते, अशी माहिती कुचकोरवीलाच्या वतीने वकील युग चौधरी यांनी न्यायालयाला दिली. आईच्या हत्येमागचा त्याचा हेतू अस्पष्ट आहे. कोणत्या कारणांनी त्याने हे कृत्य केले आणि का केले त्याबाबत कुटुंबीयांमध्येही संभ्रमावस्था आहे. कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना एक चांगला माणूस मद्याच्या आहारी गेला होता, असेही चौधरी यांनी न्यायालयाला सांगितले. तर आईचे अवयव खाण्याच्या उद्देशाने हत्या केल्याचा पोलिसांचा आरोप होता.

दरम्यान, सुनील कुचकोरवीलाची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे मुलीच्या लगनासाठी त्याला नेताना लागणाऱ्या पोलीस संरक्षणाचा खर्च उचलण्यास तो असमर्थ असल्याचे निदर्शनास येताच न्यायालयानेही त्याचा संरक्षणाचा खर्च आकारला जाऊ नये, असे आदेश सरकारला दिले. तसेच आरोपी कुचकोरवीला सध्या कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असून मुलीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी त्याला २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत घरी नेण्यात यावे आणि संध्याकाळी सहा वाजता परत कारगृहात आणावे असे आदेश कारागृह अधीक्षक आणि प्रशासनाला दिले.