जुन्या वादातून तरूणावर कोयत्याने सपासप वार, संगमवाडी परीसरातील घटना; एकाला अटक

जुन्या वादातून एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना संगमवाडी परिसरात घडली आहे. पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 

    पुणे : जुन्या वादातून एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना संगमवाडी परिसरात घडली आहे. पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

    कानिफनाथ कोलार (वय ४० रा. संगमवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. परिमल बोर्ड (वय ३२ रा. संगमवाडी) या घटनेत गंभीर जखमीचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    परिमल व कोलार यांच्यात काही दिवसांपुर्वी भांडणे झाली होती. त्याचा राग कानिफनाथच्या मनात होता. दरम्यान कोलार हे संगमवाडी येथून जात असताना परिमलने त्यांना अडविले. त्याच्यावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.