नियमीत दूध दरात प्रतिलिटर तीन रुपये वाढ

वारणा दूध संघाची वार्षिक सभा खेळीमेळीत

    वारणानगर : ज्या म्हैस दूध उत्पादकांना फरक बिल नको असेल अशाना नियमीत दूध दरात प्रतिलिटर तीन रुपये वाढ आणि फरक बिल घेऊ इच्छिणाऱ्यांना आता एक रुपये वाढ देऊन अडीच रुपयाप्रमाणे फरकबिल, गावपातळीवर दूध संस्थातच वेगळ्या मोबदल्यात वारणा दूध संघाचे कामकाज प्रस्ताव अशा महत्वपूर्ण घोषणा वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी वारणा दूध संघाच्या ५५ व्या वार्षिक सभेत केली. यावेळी उपाध्यक्ष एच. आर. जाधव उपस्थित हाेते.

    वारणा दूध संघाची ५५ वी वार्षिक सभा संस्थेच्या कार्यस्थळावर वारणा समुहातील संस्थांचे प्रमुख व सभासदांच्या मोठ्या उपस्थितीत होऊन सर्व विषयाना सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. यावेळी वारणा दूध संघाच्या नविन उत्पादनाचे उदघाटन डाॅ. कोरे यांच्या हस्ते झाले. कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यानी स्वागत करुन नोटीस व विषय वाचन केले. अामदार काेर म्हणाले, वारणा दूध संघाच्या वार्षिक उलाढालीत वाढ होऊन ती अहवाल सालात १३८९ कोटी रुपयांची झाली अाहे. व्यवसायात ए मानांकन मिळाले अाहे. महाराष्ट्र शासनाच्या कायद्यात बदल करून मान्यता मिळालेले पशुवैद्यकीय महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करणार असल्याचे कोरे यांनी सांगितले. यावेळी सर्वाधिक पुरवठा करणारे दूध उत्पादक, संस्थां आणि गोठेधारक यांचा, एनसीडीएफआयचे कार्यकारी संचालक श्रीनिवास सज्जा व डॉ. अविनाश घोले, संजीव अग्रवाल, हर्षा ग्रांधी यांचा डाॅ. विनय कोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. संचालक शिवाजी कापरे यानी आभार मानले.

    फरक बिल वाटप पद्धतीत बदल
    महाराष्ट्रात परवानगी नसताना कंपन्यांचा शिरकाव, दुध संस्थाचं काबीज करण्याचा मोठमोठ्या कंपन्यांकडून प्रयत्न-आमिषे यामुळे या क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. स्पर्धेत टिकणे महत्वाचे अाहे. व्यवसायातील वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी फरक बिल वाटप पद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय वारणेला घ्यावा लागत असल्याचे काेरे यांनी सांगितले.