इंस्टाग्राम रील बघून सुचली चोरीची युक्ती, पण मडगार्डवरील लाल पट्ट्याने केला घात

सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारावर किसन तेजबहादूर थलारी वय ४० वर्ष राहणार कातकरी पाडा रबाळे मुळगाव उत्तराखंड व मोसीन मसूद खान या दोन आरोपींना अटक करण्यात आली.

    नवी मुंबई : सीमा सुनील मिश्रा या आपल्या रहिवासी संकुलाच्या प्रवेशद्वारावर उभ्या असताना रिक्षातून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सीमा यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरी करून पळून गेले होते. याबाबत सीमा मिश्रा यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार केली असता अशाच प्रकारे अन्य चार गुन्हे दाखल घडल्याने, पोलिसांनी तातडीने तपासायला सुरुवात केली होती. सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारावर किसन तेजबहादूर थलारी वय ४० वर्ष राहणार कातकरी पाडा रबाळे मुळगाव उत्तराखंड व मोसीन मसूद खान या दोन आरोपींना अटक करण्यात आली. असून सहा गुणांची उकल करून त्यांच्या जळून २ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

    अटक दोन्ही आरोपींनी इंस्टाग्रामवरील रील बघून त्यांना या गुन्ह्याची कल्पना सुचली होती. मात्र घटनास्थळावरील येणाऱ्या व जाणाऱ्या मार्गावरील सुमारे ७० ते ८० सीसीटीव्ही तपासल्यावर लक्षात आले की गुन्ह्यात वापलेल्या रिक्षाच्या पाठीमागील डाव्या बाजूवरील मरगांवर लाल रंगाचा पट्टा असल्याचे आढळून आले. पोलीस पथकाने सतत तीन दिवस रात्र दिघा चिंचपाडा यादव नगर, साठे नगर, भीम नगर या भागात ग्रस्त घालताना रबाळे एमआयडीसी परिसरात सदर प्रकारची रिक्षा आढळून आली त्यातील चालक व प्रवासी किसन तेजबहादूर थलारी वय ४० वर्ष राहणार कातकरी पाडा रबाळे मुळगाव उत्तराखंड व मोसीन मसूद खान वय ३८ वर्ष राहणार ऐरोली या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्या जवळून ६ गुन्ह्यांची उकल करून २ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल रबाळे पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदर गुन्ह्यांची कल्पना ही इंस्टाग्राम वरील बघून आल्याची कबूल देखील यावेळी आरोपींनी दिली आहे.